Lok Sabha Election 2024 : नवनीत राणांसमोर आव्हान वाढलं? आंबेडकरांना 'या' पक्षाने दिला पाठिंबा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

lok sabha election 2024 amravati lok sabha navneet rana asududdin owaisi aimim support anandraj ambedkar maharashtra politics
AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी देखील आंबेडकरांना पाठिंबा दिला आहे.
social share
google news

Asududdin Owaisi Aimim support Anandraj Ambedkar : अमरावती लोकसभा मतदार संघात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमरावतीच्या या जागेवर आनंदराज आंबेडकर यांना आधीच वंचितचा उमेदवार मागे घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे. त्यात आता AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी देखील आंबेडकरांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अमरावतीत आंबेडकरांची ताकद चांगली वाढणार आहे. या ताकदीमुळे नवनीत राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (lok sabha election 2024 amravati lok sabha navneet rana asududdin owaisi aimim support anandraj ambedkar maharashtra politics)  

आनंदराज आंबेडकर यांनी AIMIM ला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. "अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना AIMIM पाठिंबा जाहीर करताना मला आनंद होत आहे. मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विजयासाठी काम करण्याचे आवाहन करतो, असे ओवेसी यांनी एक्सवर सांगितले आहे. दरम्यान याआधी प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने प्राजक्ता पिल्लेवान हा त्यांचा जाहिर केलेला उमेदवार मागे घेऊन पाठिंबा जाहीर केला होता. या संदर्भातलं पत्र देखील आंबेडकरांनी एक्सवर शेअर केलं होतं. 

हे ही वाचा : Nana Patole : सांगली, भिवंडीची जागा काँग्रेसने का सोडली?

अमरावतीतून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. तसेच महायुतीचाच एक भाग असलेल्या शिंदेचे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून दिनेश बूब यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. तर या जागेवर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे बळवंत वानखेडे रिंगणात आहेत.त्यामुळे अमरावतीत तिरंगी लढत होणार आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अमरावतीत काँग्रेसची मोठी ताकद आहे. कारण या मतदार संघात काँग्रेसचे तीन आमदार आहे. तर बच्चू कडू यांच्या प्रहारचे दोन आमदार आहेत. आणि भापजचे एकमेव रवी राणा हे आमदार आहेत. या जागेवर काँग्रेसची मोठी ताकद आहे, त्यामुळे निवडणुकीत बळवंत वानखेडे यांना मोठा फायदा होणार आहे. तर बच्चू कडू यांनी सूरूवातीपासूनच नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. इतकचं नाही तर प्रहार पक्षातर्फे दिनेश बूब यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे नवनीत राणांसमोर मोठं आव्हान असणार आहे. आता या जागेवरून कोण बाजी मारतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

हे ही वाचा : "भावाला बहिणीसोबत कपडे उतरवून...", मुनगंटीवार मोठ्या वादात

    follow whatsapp

    ADVERTISEMENT