देशात कोरोना रुग्ण वाढताच लॉकडाऊनबाबत पाहा केंद्र सरकारने काय दिला आदेश
नवी दिल्ली: ‘लॉकडाऊन (Lockdown) हा अंतिम पर्याय आहे’, असं स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी काही दिवसांपूर्वी देशाला संबोधित करताना म्हटलं होतं. लॉकडाऊनमुळे बरंच आर्थिक नुकसान होत असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळेच आतापर्यंत अनेक जण लॉकडाऊनला विरोध करत असल्याचं दिसून आलं होतं. महाराष्ट्रात देखील भाजपच्या नेत्यांनी लॉकडाऊनला बराच विरोध केला होता. मात्र असं असताना […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: ‘लॉकडाऊन (Lockdown) हा अंतिम पर्याय आहे’, असं स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी काही दिवसांपूर्वी देशाला संबोधित करताना म्हटलं होतं. लॉकडाऊनमुळे बरंच आर्थिक नुकसान होत असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळेच आतापर्यंत अनेक जण लॉकडाऊनला विरोध करत असल्याचं दिसून आलं होतं. महाराष्ट्रात देखील भाजपच्या नेत्यांनी लॉकडाऊनला बराच विरोध केला होता. मात्र असं असताना आता केंद्र सरकारनेच (Central Govt) लॉकडाऊनबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने आता एक परिपत्रक देखील जारी केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, कोरोना (Corona) संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक कंटेन्मेंट झोन तयार करुन तिथे 14 दिवसांच्या लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो.
मागील काही दिवसांपासून दररोज कोरोनाचे नवे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. ज्या भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे अशा ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना कोविड व्यवस्थापन आणि नियंत्रणाच्या कठोर उपायांवर विचार करण्याची तातडीची गरज असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे.
तसंच यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे की, वाढते कोरोना रुग्ण आणि संक्रमण आपण नियंत्रणात आणू शकलो नाही तर आपल्याकडे सध्या जी आरोग्य व्यवस्था आहे ती कोलमडून पडेल. यावर अधिक जोर देण्यात आला आहे.