Asaram Case: बलात्कार प्रकरणात आसाराम दोषी, उद्या शिक्षा सुनावणार!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Asaram convicted in Rape case: सुरत: 2013 सालच्या बलात्कार प्रकरणात (Rape Case) आसाराम बापूच्या (Asaram) अडचणीत वाढ होणार आहे. कारण सत्र न्यायालयाने (Court) त्याला दोषी (convicted) ठरवले असून उद्या (31 जानेवारी) त्याची शिक्षा जाहीर होणार आहे. त्या प्रकरणात न्यायालयाने अन्य आरोपींना निर्दोष ठरवले आहे. अशा स्थितीत इतरांना दिलासा तर आसारामला मोठा धक्का बसला आहे. (asaram convicted in rape case court will announce sentence tomorrow)

ADVERTISEMENT

काय आहे प्रकरण, काय म्हणाले कोर्ट?

मिळालेल्या माहितीनुसार, 2013 साली आसारामने सुरतमधील एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. त्याचवेळी नारायण साईवर याच पीडितेच्या लहान बहिणीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसाराम व्यतिरिक्त त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार महिला अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा हे देखील आरोपी आहेत.

हे वाचलं का?

यावेळी आसारामला व्हर्चुअली कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सुनावणीनंतर कोर्टाने आसारामला दोषी ठरवले पण अद्याप शिक्षा जाहीर केलेली नाही. शिक्षेबाबत उद्या निर्णय दिला जाईल, असे कोर्टाने यावेळी स्पष्ट केलं.

जोधपूर: जेलमध्ये असलेल्या आसाराम बापूंची तब्येत बिघडली, उपचार सुरु

ADVERTISEMENT

आसाराम याआधीच दुसऱ्या एका बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. सध्या तो जोधपूर कारागृहात बंद आहे. तसे, याआधीही जेव्हा-जेव्हा आसारामला न्यायालयाकडून दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही सुप्रीम कोर्टात आसारामच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली होती.

ADVERTISEMENT

म्हातारपण आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामीन मिळायला हवा, असे त्यावेळी आसाराम म्हणाला होता. मात्र, न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तसे केले नाही. आता एकीकडे त्या जुन्या प्रकरणात शिक्षा भोगत असताना दुसरीकडे सुरत प्रकरणातही शिक्षा सुनावली जाणार आहे. म्हणजेच आसारामला फार काळ दिलासा मिळणार नाही.

Crime : ‘बेस्ट फ्रेंडनेच’ केला विश्वासघात! मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

आसाराम याच्यावर बलात्कार, अनैसर्गिक लैंगिक संबंध, गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करणे आदी आरोप आहेत. आसारामची पत्नी आणि मुलीसह अन्य 6 सहआरोपींवर गुन्ह्यास प्रवृत्त करणे, ओलीस ठेवणे आणि कट रचण्याचे आरोप होते. पण त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दोन बहिणींनी नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे सुरत पोलिसांनी 6 ऑक्टोबर 2021 रोजी एफआयआर नोंदवला होता. एक गुन्हा आसारामवर तर दुसरा त्याचा मुलगा नारायण साई याच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता. दोघांवर बलात्कार, लैंगिक छळ, बेकायदेशीर ओलीस ठेवण्यासह अनेक कलमे लावण्यात आली आहेत.

दरम्यान, आसारामविरोधात दाखल केलेली तक्रार अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. कारण ही घटना तेथील आश्रमात घडली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT