पुण्याच्या आशिषनं Apple चं पोर्टल हॅक केलं; म्हणून कंपनीनं दिलं त्याला इतक्या लाखांचं बक्षीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

बग बाउंटी प्रोग्रामचे नाव तुम्ही ऐकले असेलच. या कार्यक्रमांतर्गत, सर्व टेक कंपन्या जेव्हा लोक त्यांच्या उत्पादनातील समस्या सांगतात तेव्हा त्यांना पैसे देतात. असाच एक बग पुण्याच्या आशिष ढोणे याने शोधून काढला आहे. Apple ने आशिषला $7000 (जवळपास 5,58,890 रुपये) बक्षीस म्हणून दिले आहेत. अॅपलने आशिषला ब्लाइंड एक्सएसएस शोधल्याबद्दल हे बक्षीस दिलं आहे.

आशिषने सांगितले की, यापूर्वी त्याने अॅपल टीचर लर्निंग सेंटरचे पोर्टल हॅक केले होते. नंतर अॅपलने या पोर्टलमध्ये पाहिजे ते बदल केले. मात्र त्यानंतरही त्याने पोर्टल हॅक केले. आशिषने अॅपलला या त्रुटीची माहिती दिली. त्यानंतर कंपनीने त्याला बक्षीस दिले आहे.

LinkedIn वर बक्षिसाची माहिती शेअर केली

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आशिषच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्याचे नाव जगातील टॉप 120 गुगल हॅकर्सच्या यादीत समाविष्ट आहे. त्याला 2021 मध्ये सर्वोत्कृष्ट बग हंटरचा किताबही मिळाला आहे. त्याच्या लिंक्डइन पोस्टसह, आशिषने ऍपलच्या मेलचा स्क्रीन शॉट देखील जोडला आहे, ज्यामध्ये त्याला बगची तक्रार केल्याबद्दल बक्षीस जाहीर झाले आहे. Apple ने पाठवलेल्या ई-मेलमध्ये असे म्हटले आहे की तुमचा पाठवलेला अहवाल Apple सिक्युरिटी बाउन्टीसाठी पात्र ठरला आहे. Apple तुम्हाला 7 हजार डॉलर्स बक्षीस म्हणून देत आहे. एखाद्या व्यक्तीला बग बाउन्टीसाठी पैसे मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही.

व्हॉट्सअॅपमधील कमतरता दाखवून दिल्यावरही पैसे मिळाले होते

ADVERTISEMENT

अलीकडेच मेटाने जयपूरच्या मोनिका अग्रवालला व्हॉट्सअॅपमध्ये बग शोधल्याबद्दल बक्षीस दिले. वास्तविक, व्हॉट्सअॅपमध्ये एक त्रुटी होती, ज्यामुळे वापरकर्त्यांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या लोकांनाही शेवटचा सीन दिसत होता. मोनिकाने ही माहिती मेटाला दिली आणि कंपनीला तिची माहिती बरोबर असल्याचे आढळली. यानंतर कंपनीने तिला 1500 डॉलर (सुमारे 1.2 लाख रुपये) बक्षीस दिले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT