वाघ म्हणता उंदरात पण खाता? शेलारांचे ठाकरेंना सवाल, BMC च्या कारभाराचे काढले वाभाडे
‘मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं कचऱ्यात खाल्ले, नाल्यात खाल्ले. महापालिकेत उंदीर मारण्यात घोटाळा झाला. पाच वार्डात उंदीर मारले खर्च झाला एक कोटी. किती मारले? कुठे पुरले? नोंद कुठे केली? फाईल दाखवा तर म्हणतात पुरात वाहून गेली? वाघ म्हणता उंदरात पण खाता? खाण्याचे ट्रेनिंग घेण्यासाठी चारा घोटाळ्यातील लालूंच्या मुलाला भेटायला गेला होता काय?, असा सवाल […]
ADVERTISEMENT

‘मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं कचऱ्यात खाल्ले, नाल्यात खाल्ले. महापालिकेत उंदीर मारण्यात घोटाळा झाला. पाच वार्डात उंदीर मारले खर्च झाला एक कोटी. किती मारले? कुठे पुरले? नोंद कुठे केली? फाईल दाखवा तर म्हणतात पुरात वाहून गेली? वाघ म्हणता उंदरात पण खाता? खाण्याचे ट्रेनिंग घेण्यासाठी चारा घोटाळ्यातील लालूंच्या मुलाला भेटायला गेला होता काय?, असा सवाल करत आशिष शेलार यांनी ठाकरेंवर प्रहार केला.
भाजपच्या जागर मुंबईचा अभियानांची 14वी सभा माहीम विधानसभा मतदारसंघातील प्रभादेवी येथे पार पडली.
या सभेत बोलताना आशिष शेलार म्हणाले, ‘प्रभादेवी मंदिर समोर सापडलेला अन्य धर्मीयांचा दगड आमच्या मंदिराच्या दरवाज्यात तुमच्या नगरसेविकेने का ठेवला? माहिमचं दत्त मंदिर पुनर्निर्माण करण्याऐवजी ते तोडलं पाहिजे अशी नोटीस निघते कशी? कोरोना काळात याकूब मेमन थडग सुशोभीकरण केले जाते’, हे मुद्दे उपस्थित करत शेलारांनी ठाकरेंना सवाल केले.
‘दाऊदशी संबंध असणारे नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज्याकडे पुरावे मागितले जातात. औरंगजेबाचे स्वप्न उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले’, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.