नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची जबरदस्त गुगली!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी आज (४ फेब्रुवारी) विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारमधील सत्तेची गणितं पुन्हा एकदा बदलली आहे. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अत्यंत सूचक असं वक्तव्य केलं आहे. कारण आता विधानसभा अध्यक्ष निवडण्यासाठी आता तीनही पक्षात पुन्हा एकदा चर्चा केली जाणार आहे. स्वत: शरद पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या वाट्याला गेलेलं विधानसभा अध्यक्षपद आता नेमकं कोणत्या पक्षाकडे जाणार यावरुन राजकीय वर्तुळात अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना देखील जोर लावणार आहे.

पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, याविषयी ‘मुंबई तक’शी बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष बदलताना आमच्याशी चर्चा केली आहे. काँग्रेस पक्षांतर्गत दबाव असल्याने विधानसभा अध्यक्ष बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष पदावर पुन्हा चर्चा होणार आहे. विधानसभा अध्यक्षपद हे तीन पक्षाचं होतं. जे आता पुन्हा खुलं झालं आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ते पुढे असंही म्हणाले की, ‘2019 साली ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार अध्यक्षपद हे काँग्रेसला देण्याचं ठरलं होतं. पण त्यावेळी असं नव्हतं ठरलं की, अध्यक्ष वर्षभरानंतर राजीनामा देतील.’ असं म्हणत शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे की, विधानसभा अध्यक्षपदावर आता तीनही पक्ष दावा करु शकतात.

नाना पटोले यांनी आपला राजीनामा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे सुपूर्द केला आहे. नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचं समजतं आहे. दरम्यान, हा राजीनामा देण्याआधी नाना पटोले यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. तसेच काल रात्रीच राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर एकूणच या सगळ्या घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीमधील सत्तेची गणितं पुन्हा बदलली!

ADVERTISEMENT

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये पुन्हा एकदा खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे अशीही चर्चा आहे की, शिवसेना काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देऊन विधानसभा अध्यक्षपद आपल्याकडे ठेऊ इच्छित आहे. पण आता शरद पवार यांनी असा दावा केला आहे की, हे पद तीनही पक्षांसाठी खुलं आहे.

जेव्हा महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं तेव्हा सत्तेचा एक फॉर्म्युला ठरला होता. त्यानुसार विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाटेला आलं होतं. त्यामुळे आता देखील काँग्रेस या पदावरील आपला दावा कायम ठेऊ शकतं. मात्र असं असलं तरीही राष्ट्रवादी काँग्रेस आता या पदासाठी अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT