बोटं गमावली पण हिंमत नाही! कल्पिता पिंपळे म्हणतात पुन्हा फिल्डवर येऊन काम करणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाण्यातील माजिवाडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या आजपासून कामावर रूजू झाल्या. तीन महिन्यांपूर्वी फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना एका फेरीवाल्याने हल्ला करून त्यांची बोटं छाटली. ठाण्यातील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातून त्या सावरल्या आहेत आणि कामावर रूजू झाल्या आहेत.

ADVERTISEMENT

पिंपळे यांच्यावर शस्त्रक्रीया करुन त्यांच्या तुटलेल्या बोटापैकी एक बोट जोडण्यात आलं आहे. पुढील 48 तास पिंपळे यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली रहावं लागणार आहे. दरम्यान पिंपळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपी अमरजीत यादवला ठाणे न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे वाचलं का?

30 ऑगस्टला काय घडलं होतं?

ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या महिला अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांनी प्राणघातक हल्ला केला. माजीवडा-मानपाडा विभागाच्या सह आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला करुन त्यांची बोटं छाटली. या हल्ल्यात पिंपळे जखमी झाल्याअसून त्यांच्यावर घोडबंदर परिसरातील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. कल्पिता पिंपळे यांच्यासोबत असलेल्या सुरक्षारक्षकालाही या हल्ल्यात इजा झाली होती. या घटनेनंतर अवैध फेरीवाल्यांच्या मुजोरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

ADVERTISEMENT

अमरजीत यादव असं या हल्लेखोर फेरीवाल्याचं नाव असून पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली असून त्याच्या जवळचा चाकूही पोलिसांनी जप्त केला. हा हल्ला इतका भयंकर होता की घटनास्थळी असलेल्या आजूबाजूच्या नागरिकांना देखील मनात घडकी भरली होती, तर उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी दुरूनच फोटो, व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली होती.

ADVERTISEMENT

आरोपी अमरजीत यादव हा मुळचा बिहारचा असून तो ठाण्याच्या ब्रम्हांड परिसरात राहतो. याआधीही ३ वर्ष अगोदर अमरजीतने अशाच प्रकारे हल्ला केला होता. आरोपी कासारवडवली पोलिसांच्या अटकेत असून पोलीस पुढील कारवाई करत असल्याचं कळतंय.

आज काय म्हणाल्या कल्पिता पिंपळे?

आज तीन महिन्यांनी मी कामावर रूजू झाले. हल्ला झाला तो क्षणिक कालावधी होता. मात्र त्यानंतरचे तीन महिने खूप वेदनादायी होती. कारण मी दुसऱ्या कुणावर तरी अवंलबून राहात होते. माझी परिस्थिती एखाद्या लहान मुलीसारखी झाली होती. माझ्या मोठ्या वहिनीने मला खूप सावरून घेतलं. आज मी माझ्या वहिनीमुळेच पुन्हा उभारी धरू शकले. तसंच डॉक्टर पराग लाड आणि प्रिया तावडे यांनीही खूप मेहनत घेतली आणि मला आत्मविश्वास दिला. फेरीवाले हे काही आमचे शत्रू नाहीत. मात्र त्यांनी दिलेल्या जागेवर त्यांनी त्यांचा व्यवसाय करावा अनधिकृत काही असेल तर कारवाई केली जाणार आणि मी फिल्डवर जाऊनही काम करणार आहे. मी रूग्णालयात दाखल होते तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह अनेक मंत्र्यांनी मला पाठिंबा दिला. आम्ही घाबरणार नाही, फिल्डवर काम करणार पडेल ती जबाबदारी घेणार असा निर्धारही कल्पिता पिंपळे यांनी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT