कोल्हापुरातल्या सुप्रसिद्ध राजाभाऊ भेळच्या मालकावर तिघांकडून प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न
दीपक सूर्यवंशी, प्रतिनिधी, कोल्हापूर कोल्हापुरातल्या प्रसिद्ध राजाभाऊ भेळच्या मालकावर तिघांकडून प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. फुकट खाण्याच्या कारणावरून कोल्हापुरातल्या खाऊ गल्लीत वादाची घटना ८ दिवसांपूर्वी घडली होती. त्यावेळी पाचगाव परिसरातील तरुणांना व्यवसायिकांनी चोप दिला होता. आज पुन्हा आभिषेक सरदार, गणेश यलगट्टी, प्रथमेश गायकवाड या तरूणांनी खासबाग परिसरात शस्त्रांद्वारे दहशत निर्माण करत ‘राजाभाऊ भेळ’चे मालक […]
ADVERTISEMENT

दीपक सूर्यवंशी, प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापुरातल्या प्रसिद्ध राजाभाऊ भेळच्या मालकावर तिघांकडून प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. फुकट खाण्याच्या कारणावरून कोल्हापुरातल्या खाऊ गल्लीत वादाची घटना ८ दिवसांपूर्वी घडली होती. त्यावेळी पाचगाव परिसरातील तरुणांना व्यवसायिकांनी चोप दिला होता. आज पुन्हा आभिषेक सरदार, गणेश यलगट्टी, प्रथमेश गायकवाड या तरूणांनी खासबाग परिसरात शस्त्रांद्वारे दहशत निर्माण करत ‘राजाभाऊ भेळ’चे मालक रवींद्र शिंदे यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने ते यातून बचावले. मात्र या हल्लेखोरांना स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला. यापैकी दोघा हल्लेखोरांना अटक करण्यात जुना राजवाडा पोलिसांना यश आल.
कोल्हापुर पाचगांव इथले काही तरूण ८ दिवसांपूर्वी खासबाग मैदान नजीकच्या खाऊ गल्लीत गेले होते. तिथं त्यांनी दोन ते तीन व्यवसायिकांच्या कडून खाद्यपदार्थ मागितले. त्यानंतर पैसे न देताच ते निघून जात होते. त्यावेळी त्या तिघांसोबत खाऊ गल्लीतील व्यावसायिकांचा वाद झाला. त्यातून एका तरुणाला व्यवसायिकांनी मारहाण केली होती. तसंच त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. मात्र त्यावेळी जुना राजवाडा पोलिसांनी त्या तरुणाला समज देऊन सोडलं होतं.