मराठवाड्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठ्या घोटाळ्यात पहिला गुन्हा दाखल
मराठवाड्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा समजल्या जाणाऱ्या ‘तीस-तीस’ घोटाळ्यात पहिला गुन्हा औरंगाबाद ग्रामीण पोलिसात दाखल झाला आहे. औरंगाबादच्या बिडकीन पोलीस ठाण्यात याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला आहे. तर यातील मुख्य आरोप संतोष उर्फ सुनील राठोड याच्याविरोधात सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अधिकचा व्याजदर […]
ADVERTISEMENT

मराठवाड्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा समजल्या जाणाऱ्या ‘तीस-तीस’ घोटाळ्यात पहिला गुन्हा औरंगाबाद ग्रामीण पोलिसात दाखल झाला आहे. औरंगाबादच्या बिडकीन पोलीस ठाण्यात याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला आहे. तर यातील मुख्य आरोप संतोष उर्फ सुनील राठोड याच्याविरोधात सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अधिकचा व्याजदर देण्याचे आमिष दाखवून संतोष राठोड याने ‘तीस-तीस’ योजनेत पैसे गुंतवण्यासाठी आमिष दाखवले. बँकेत मिळणाऱ्या व्याजाच्या चारपट अधिक व्याज देऊन सुरवातील स्व:ताची मार्केटींग केल्यानंतर राठोड गेल्या 8 महिन्यापासून फरार आहे. त्यामुळे पैसे मिळण्याची अपेक्षाभंग झाल्याने पैठण तालुक्यातील जांभळी गावातील गुंतवणूक करणाऱ्या महिलने बिडकीन पोलीस गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा घोटाळा तब्बल 500 कोटी पेक्षा अधिकचा आहे. विशेष म्हणजे यात मोठ्याप्रमाणावर शेतकरी अडकले आहे. ज्या भागात सरकारी प्रकल्प राबवली जातात, त्या भागातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यावर राठोड याने लक्ष ठेवून शेतकऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवले. पोलीस आता राठोड याचा शोध घेत असून, तो सध्या फरार झाला असल्याचे बोलले जात आहे.
‘तीस-तीस’ घोटाळा म्हणजे काय?