दरोडेखोर पोलिसाच्या हातालाच चावला, फटकामार चोराला शिताफिनं पकडलं
कल्याण: रेल्वेत प्रवास करताना दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशाच्या हातावर काठी मारून मोबाइल लुटणाऱ्या दरोडेखोराला कल्याण रेल्वे पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. पण अटकेपासून वाचण्यासाठी दरोडेखोराने चक्क पोलिसालाच दाताने चावा घेतला. ज्यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. अटक केलेल्या दरोडेखोरावर शहरातील विविध पोलिस ठाण्यात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या न्यायालयाने त्याला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली […]
ADVERTISEMENT

कल्याण: रेल्वेत प्रवास करताना दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशाच्या हातावर काठी मारून मोबाइल लुटणाऱ्या दरोडेखोराला कल्याण रेल्वे पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. पण अटकेपासून वाचण्यासाठी दरोडेखोराने चक्क पोलिसालाच दाताने चावा घेतला. ज्यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. अटक केलेल्या दरोडेखोरावर शहरातील विविध पोलिस ठाण्यात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या न्यायालयाने त्याला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मनीषा ज्ञानचंद होतचंदानी डोंबिवली ते अंबरनाथ लोकल ट्रेनने आपल्या घरी परतत असताना कल्याण विठ्ठलवाडी स्थानकाच्या मधोमध एका खांबाच्या आच्छादनाखाली एक चोर उभा होता. पण खाली उतरल्यानंतर विठ्ठलवाडीत तैनात असलेल्या जीआरपीला माहिती देऊन कल्याणला गेले. त्याच्यासोबत स्टेशन आणि नंतर पायीच घटनास्थळी गेले.
घटनास्थळी मनीषाने पाहिले की, ज्या चोराने तिचा मोबाईल पाडला होता त्यालाच साध्या गणवेशातील पोलिसांनी पकडला होता. विकास केदारे हे साध्या वेशात ड्युटीवर असताना पत्री पुल होमीबाबा टेकडी येथील रहिवासी असलेल्या अजय अर्जुन कांबळे या चोरट्याने पळून जाण्याच्या प्रयत्नात होता.
याचवेळी विकास केदारे यांनी त्याचा शर्ट पकडला. मात्र तरीही तो पळून जाणाचा प्रयत्न करत होता. त्यानंतर आरोपी अजय कांबळेने विकास केदारे यांच्या हाताला चावा घेतला. यावेळी विकासने धाडस दाखवत मजबूत पकड राखत चोरट्या अजय कांबळे याला पकडून ठेवलं.