हातापायाला जखमा अन् मृत आईच्या छातीला बिलगणारी चिमुकली; अमरावतीतील ह्रदयद्रावक घटना
नऊ महिन्यांच्या चिमुकलीला वाऱ्यावर सोडून देत एका माऊलीने आत्महत्या केली. कडाक्याच्या थंडीत काचा लागून ही चिमुकली जिवाच्या आकांताने आईला उठवण्याचा प्रयत्न करत होती. मृतदेहाच्या छातीला बिलगुन चिमुकली रडत असल्याचं निर्दशनास आल्यानंतर ही ह्रदयद्रावक घटना समोर आली. अंगावर शहारा आणणारा हा सगळा प्रसंग सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे-तळेगावकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितला. त्याचबरोबर आत्महत्या न करण्याचं […]
ADVERTISEMENT
नऊ महिन्यांच्या चिमुकलीला वाऱ्यावर सोडून देत एका माऊलीने आत्महत्या केली. कडाक्याच्या थंडीत काचा लागून ही चिमुकली जिवाच्या आकांताने आईला उठवण्याचा प्रयत्न करत होती. मृतदेहाच्या छातीला बिलगुन चिमुकली रडत असल्याचं निर्दशनास आल्यानंतर ही ह्रदयद्रावक घटना समोर आली. अंगावर शहारा आणणारा हा सगळा प्रसंग सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे-तळेगावकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितला. त्याचबरोबर आत्महत्या न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
ADVERTISEMENT
गुंजन गोळे तळेगावकर यांची फेसबुक पोस्ट
मरण फार स्वस्त झालंय हो
हे वाचलं का?
आज सकाळी 8.30 च्या दरम्यान PSI चव्हाण सर यांचा गाडगेनगर पोलीस स्टेशनमधून फोन आला. ‘आपण गुंजनताई बोलताय का? PKV कॉलेज वेलकम पॉईंटला एका बाईचं बेवारस प्रेत सापडलं आहे, येऊ शकता का तुम्ही?’ ‘दहा मिनिटांमध्ये पोहोचते’ म्हणून मी त्या दिशेने निघाले.
अमरावतीमध्ये बेवारस मृतदेह सापडले की पोलीस मला कॉल करतात आणि आम्ही अंतिम विधी करतो. तसाच हा पण फोन असेल असं मला वाटलं. पण घटनास्थळी पोहोचताच माझे हात पाय आज पहिल्यांदा ढिले पडले. कारणही तसंच होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
साधारण 30/32 वर्षांची बाई समोर मृत होती आणि तिच्या छातीला बिलगून अंदाजे 9/10 महिन्यांची मुलगी जिवाच्या आकांताने रडत होती. हातापायाला काच रुतल्याने जखमा होऊन बाळ प्रचंड अस्वस्थ झालं होतं. उजव्या पायाचे फिमर बोन फ्रॅक्चर होऊन पाय प्रचंड सुजला होता. अंगावर पांघरुण काहीही नसल्यानं रात्रभर त्या जंगली भागात कडाक्याच्या थंडीत मेलेल्या आईला उठवण्यासाठी जिवाचा आटापिटा करणारं बाळ राहून राहून दचकत होतं आणि गर्दी बघून परत रडत होतं. मी त्याला जवळ घेतले, ते दुधपितं बाळ होतं. मेलेल्या आईचे स्तन ड्रेसबाहेर काढून ते रात्री प्यायलं होतं, असं प्रत्यक्षक्षणी बघितल्यावर आम्ही अंदाज काढला होता.
बाळाला कुशीत घेतलं आणि तिथेच खाली बसून शेकडोंच्या गर्दीत त्याच्या तोंडात पटकन स्तन देऊन दूध पाजू लागले आणि डोळ्यातील पाणी लपवू लागले. माझ्या कुशीत येऊन त्याला नेमकं काय वाटलं, हे माहित नाही. त्यानंतर तब्बल पाच तास ते माझ्या कुशीतून बाजूला व्हायलाही तयार नव्हतं. त्याला भाऊ ऋषिकेश देशमुखच्या मदतीने परिजात हॉस्पिटलमध्ये नेलं. तपासणी करुन जखमांना मलम लावून परत पोलीस स्टेशनला नेलं. तेवढ्यात तिथे त्याच महिलेचा अंदाजे चार वर्षांचा मुलगा पण सापडला. पुढील प्रोसेस म्हणून डॉ. दिलीप काळे सरांचे मार्गदर्शन घेऊन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी डबले सरांना कॉल केला. केअर सेंटरमध्ये नेलं. आंघोळ घातली. जेवू घातलं. परत साडेचार वाजता लेडी कॉन्स्टेबलला घेऊन बाळाला इर्विंनला नेलं. डॉक्टरांना विनंती करून x-ray केला. कॉन्स्टेबल ताईने बाळाला प्लॅस्टर लावून परत बाळ केअर सेंटरला नेलं. रात्री आठ वाजता PI चोरमोले साहेबांना भेटून पुढील चौकशी आणि काही महत्त्वाचं बोलणं केलं. पत्रकारांच्या फोनला प्रतिसाद दिला.
हे सर्व करत अस्ताना कितीतरी वेळा बाळाला माझे दूध पाजलं, तेव्हा वारंवार एकच विचार येत होता की, त्या बाईला नेमकं काय एवढं दुःख होतं की दुधपित्या लेकराचा विचार येऊ नये? मोठ्या मुलाच्या चौकशीवरुन तिच्या घरचा पत्ता पोलिसांना सापडला. नातेवाईक थोड्या वेळात पोहोचतीलही, पण घरातून नवऱ्याशी वाद होऊन चक्क बुटीबोरी एरियातून लेकरांना घेऊन निघालेली ती बाई अमरावतीला येऊन मरण पावली आणि लेकरांनाच असे पोरकं करून गेली??
त्या बाईला सकाळपासून मला एवढंच सांगावं वाटते की अग वेडे एकदा आपण आई झाल्यावर आपल्याला अश्याप्रकारे मरायचा अधिकार नसतो गं बाई (बायांनो त्रास सहन होत नाही मान्य. घरी वाद होतात मान्य, पण टोकाचा निर्णय नका घेऊ गं. फार वेदनादाई असते हे आपल्या लेकरांसाठी. कुठल्याही स्त्रिला काहीही प्रॉब्लेम असू द्या एक मोठी बहीण म्हणून मला हक्कानं कॉल करा. मी आहे तुमच्या सोबतीला. नसेल त्रास सहन होत, नाही रहायचं कुठे तर हक्कानं या माझ्याकडे. तुम्हाला सुरक्षित ठेवण्याची. तुम्हाला रोजगार देऊन सक्षम करण्याची पूर्ण जबाबदारी माझी गं बायांनो, पण अशी पळवाट नका काढू गं. आत्महत्या हा पर्याय नसतो ग!
–गुंजन गोळे, अमरावती
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT