बच्चू कडू यांचा अपघात, पायाला आणि डोक्याला जबर मार, नक्की काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अपक्ष आमदार बच्चू कडू (bachchu kadu) यांचा अपघात (accident) झाला आहे. अमरावतीमध्ये (amravati) रस्ता ओलांडत असताना अचानक दुचाकीस्वाराने (two wheeler accident) बच्चू कडू (bachchu kadu) यांना धडक दिली. दुचाकीच्या धडकेत बच्चू कडू हे गंभीर जखमी (bachchu kadu injured in bike accident) झाले आहेत. पायाला आणि डोक्याला गंभीर इजा झाली असून, डोक्याला चार टाके पडल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

राज्यात आमदारांच्या अपघातांची मालिका सुरूच आहे. आता अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. बच्चू कडू हे मुंबईवरून अमरावतीला पोहोचले होते. सकाळी रस्ता ओलांडत असतानाच ही घटना घडली आहे.

बच्चू कडू रस्ता ओलांडत असताना एका भरधाव दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत बच्चू कडू रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन पडले. यात त्यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर मार लागला. बच्चू कडू यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हे वाचलं का?

बच्चू कडूंचे भिडू कुणाचा करणार कार्यक्रम? शिंदे-फडणवीसांचं वाढलं टेन्शन

बच्चू कडू यांच्या पायाला जबर मार लागलेला असून, डोक्याला चार टाके पडल्याची माहिती आहे. बच्चू कडू यांचे उपचारानंतरचे काही फोटो समोर आले असून, त्यात त्यांच्या पायाला आणि डोक्याला मार लागलेला असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

ADVERTISEMENT

बच्चू कडू यांनी अपघातानंतर फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये’, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

भाजपच्या मिशनमुळे शिंदेंचं वाढलं टेन्शन! जेपी नड्डांची बालेकिल्ल्यात सभा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आमदारांच्या अपघाताच्या घटना घडताना दिसत आहे. भाजपचे आमदार जयकुमार गोरे एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावले. त्याची गाडी रस्त्यावरून खाली कोसळली होती.

त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीचाही भीषण अपघात झाला होता. धनंजय मुंडेंच्या छातीला या अपघातात भीषण मार लागला होता. त्यांच्यावर मुंबईत उपचार केले जात आहेत.

त्याचबरोबर रामदास कदम यांचे सुपूत्र आमदार योगेश कदम यांच्या गाडीचाही भयंकर अपघात झाला होता. योगेश कदम यांच्या कारला डंपरने धडक दिली होती. सुदैवाने योगेश कदम यांना कोणतीही इजा या अपघातात झाली नाही. विधानसभेतही आमदारांच्या अपघातांच्या घटनांवर अजित पवारांनी चिंता व्यक्ती केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT