गोणीत दोन तुकडे केलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह, पतीने हत्या केल्याचं उघड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

18 जानेवारीला ढाका येथे एका पुलाजवळ आढळला आहे. हा मृतदेह बांगला देशी अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू हिचा हा मृतदेह आहे ही माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी काही स्थानिकांनी अलीपूरच्या पुलाजवळ मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना दिली. हा मृतदेह दोन तुकड्यांमध्ये होता. तसंच त्यावर गंभीर जखमाही होत्या. यावरून अभिनेत्रीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे हे समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

अभिनेत्री हरवल्याची तक्रार तिच्या पतीने दिली होती. यानंतर पोलिसांनी तिचा पती शाखावत अली नोबल आणि त्याच्या चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यानंतर चौकशीनंतर अभिनेत्री रायमाच्या पतीने तिची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. 35 वर्षांची अभिनेत्री रायमा हीचं प्रेत दोन तुकड्यांमध्ये पोलिसांना मिळालं होतं त्यामुळे या भागात एकच खळबळ माजली होती.

हे वाचलं का?

रायमाच्या गळ्यावर जखमेचे व्रण होते. या प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या पतीनेच आता ही हत्या केल्याची कबुली दिली आहे. रायमा बांगलादेशची राजधानी ढाका या ठिकाणी ग्रीन रोड भागात तिच्या पतीसह आणि दोन मुलांसह राहात होती. रविवारी सकाळी ती शुटिंगसाठी घरातून बाहेर पडली होती. तिच्या मुलांनी रविवारी तिला काहीवेळा फोन केला होता मात्र तिने फोन घेतला नाही. त्यावेळी मुलांना वाटलं की आई शुटिंगमध्ये बिझी असेल त्यामुळे तिने फोन घेतला नसावा. मात्र त्यादिवशी संध्याकाळीही रायमा घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या पतीने कालाबागान पोलीस ठाण्यात अभिनेत्री बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

ADVERTISEMENT

रविवारी बेपत्ता झालेल्या रायमाचा मृतदेह दोन तुकड्यांमध्ये आणि गोणीत बांधलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळाला. त्यानंतर या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. बॉडी मिळाल्यानंतर रायमाच्या भावाने तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली ज्यावरून पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि त्यादरम्यान त्याने हत्येची कबुली दिल्याने त्याला अटकही करण्यात आली.

ADVERTISEMENT

पोलिसांनी जी कार ताब्यात घेतली आहे त्याच्या मागच्या सीटवर रक्ताचे डाग आहेत. घरगुती वादांमुळे आपण तिची हत्या केल्याचं तिच्या पतीने कबूल केलं आहे. तसंच या खुनात ड्रायव्हरचाही सहभाग होता असंही त्याने सांगितलं आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी रायमाचा पती आणि त्याचा ड्रायव्हर अशा दोघांनाही अटक केली आहे. एवढंच नाही तर पोलिसांनी या प्रकरणात तिच्या पतीसह एकूण सहा जणांना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT