Beed: लग्नानंतर २१ दिवसात तरूणाचा मृत्यू, पोलिसांनी पत्नीला घेतलं ताब्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहिदास हातागळे, प्रतिनिधी, बीड

ADVERTISEMENT

बीडमधल्या गेवराई या ठिकाणी एक घटना समोर आली आहे. लग्नानंतर २१ दिवसातच तरूणाचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू संशयास्पद असल्याने पोलिसांनी या तरूणाच्या पत्नीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत. पांडुरंग चव्हाण असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. पांडुरंगच्या नातेवाईकांनी या प्रकरणात गेवराई पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरूणाच्या पत्नीवर गुन्हा दाखल करावा म्हणून नातेवाईकांनी गर्दी केली होती.

नेमकी काय घडली घटना?

गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील तीन आठवड्यापुर्वी विवाह झालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.सदरील घटना ही सोमवार रोजी रात्री घडली असून यामध्ये घातपात झाला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असुन नातेवाईकांनी गेवराईचा पोलीस ठाण्यात ठिय्या देखील दिला होता. या प्रकरणी योग्य ती चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे सदरील मृत तरुणाच्या मृतदेहावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून आता प्रकरणी गेवराई पोलीस पुढील तपास करत आहेत मात्र यासंबंधी कोणता गुन्हा दाखल केला जातो हे पाहणे गरजेचे आहे.

हे वाचलं का?

पांडुरंग चव्हाणचा विवाह २१ दिवसांपूर्वी झाला होता

पांडुरंग चव्हाण याचा २१ दिवसापूर्वी विवाह झाला होता. मात्र रात्री अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याला गेवराईच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पांडुरंग यांच्या मृत्यूला त्याची पत्नी कारणीभूत असल्याने नातेवाईकांनी तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. आता पांडुरंगचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच निष्पन्न होईल. तोपर्यंत त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

लग्नानंतर अवघ्या २१ दिवसात पांडुरंगचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होते आहे. आता या प्रकरणी घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांना आहे. नेमकं प्रकरण काय आहे? हे पांडुरंगच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच समोर येणार आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणात पांडुरंगच्या पत्नीला ताब्यात घेतलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT