बीड: वाळू तस्करीचा नववा बळी; ट्रॅक्टरच्या धडकेत 42 वर्षीय व्यक्तीचा हकनाक बळी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहिदास हातागळे, बीड: अनाधिकृत वाळू उपसा करून त्याची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये घडली आहे. सोमवार (27 डिसेंबर) दुपारी ही दुर्घटना घडली असून यामुळे स्थानिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. वाळूतस्करीचा आजचा हा नववा बळी असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

बीड जिल्हाच्या गेवराई तालुक्यातील खांमगाव शिवारातून ट्रॅक्टरव्दारे अनाधिकृत वाळू उपसा करून त्यांची सर्रास तस्करी केली जाते. याच तस्करी दरम्यान ट्रॅक्टरच्या धडकेत तुकाराम बाबूराव निंबाळकर (वय 42 वर्ष रा. खामगाव ता. गेवराई, बीड) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

तुकाराम बाबूराव निंबाळकर हे गावांकडून गेवराईला काही कामानिमित्त येत असताना अनाधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने पाठीमागून जोराची धडक दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना सोमवार (27 डिसेंबर) रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान घडली आहे.

हे वाचलं का?

वाळूची तस्करी करताना धडक बसून झालेल्या घटनांमधील हा तब्बल नववा बळी आहे. त्यामुळे या भागातील नागरिक या अवैध वाळू वाहतुकीला प्रचंड वैतागले आहेत. काल झालेल्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेनंतर येथील ग्रामस्थांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेत तुकाराम निंबाळकर यांचा मृतदेह रस्त्यावर ठेऊन ठिय्या अंदोलनास सुरूवात केली होती. दरम्यान ही घटना पोलीस प्रशासनाला समजताच घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झालं. यावेळी त्यांनी ग्रामस्थांची समजूत घालून मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आणला. यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

ADVERTISEMENT

सातत्याने या अशा घटना घडत असल्याने प्रशासन काही ठोस पाऊले का उचलत नाही? असा संतप्त सवाल उपस्थित करत याठिकाणी आंदोलन सुरू केले होते. गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी जोपर्यंत येणार नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.

ADVERTISEMENT

यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घहितेशटनास्थळी भेट दिली आणि अशा घटना होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल आणि गावकऱ्यांना कारवाईचे आश्वासन दिले.

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध! पुणे-सोलापूर महामार्गावर गोळीबार; दोघांचा मृत्यू

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर तब्बल 6 तासानंतर गावकऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. ठिय्यामध्ये मनसेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, भाजपचे युवा नेते शिवराज पवार, दादासाहेब गिरी, मनोज हजारे, खामगावचे सरपंच आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT