बीडमधली धक्कादायक घटना! कुत्रा अंगावर भुंकला म्हणून बंदुकीने गोळी घालून हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहिदास हातागळे, प्रतिनिधी, बीड

ADVERTISEMENT

नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने बीड जिल्हा चर्चेत असतो आणि पुन्हा एकदा अशीच चर्चा बीड जिल्ह्यात सुरू झाली याचं कारण शेजारचा कुत्रा भुंकला म्हणून बंदुकीतून गोळ्या झाडून कुत्र्याला ठार करण्याचा धक्कादाय प्रकार बीडमध्ये घडला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेने पुन्हा बीड जिल्ह्याचर्चेत आलाय.

नेमकी काय घडली घटना?

विकास हरीभाऊ बनसोडे यांनी परळी येथील किशोर केंद्रे यांचे धारवती तांडा येथील बिअर बार हॉटेल तीन वर्षांपासून भाड्याने घेतले आहे. आणि याच हॉटलवर बनसोडे यांची उपजीविका आहे. दि.११नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३०ते ११:०० वाजताच्या दरम्यान बनसोडे आले असता त्यांना त्यांचा कुत्रा मृत अवस्थेत आढळून आला आहे.

हे वाचलं का?

कुत्रा आपल्या अंगावर भुंकतो ह म्हणत घातल्या गोळ्या

हॉटेलवर मुक्कामी असणारे अजय बालाजी नरसे, भरत गरड यांना विचारले असता शेजारील आकड्यावरील राहणारे रामराज कारभारी घोळवे हे बंदुक घेवुन आपले हॉटेल मध्ये येऊन एका कुत्र्याला बंदुकीतून गोळ्या घातल्या; माझ्या अंगावर भुंकल्यास मी मारून टाकत असतो असं घोळवे म्हणाल्याचे नोकरांनी सांगितले.

झाल्या प्रकरणी बनसोडे यांनी घोळवे यांना फोन करून विचारले असता तुमचा कुत्रा माझ्या अंगावर भुंकला म्हणून मी मारून टाकला असं सांगितलं. बनसोडे यांच्या फिर्यादी वरून घोळवे याच्यावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अंगावर कुत्रा भुंकला म्हणून त्या कुत्र्याला चक्क गोळ्या घालून ठार करण्यात आल्याने या घटनेची चर्चा बीड जिल्ह्यात होते आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT