राज्यात महिलांवरचे अत्याचार वाढले असताना रुपाली चाकणकरांवर ठाकरे सरकारने सोपवली मोठी जबाबदारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रातल्या एक आक्रमक नेत्या म्हणून रूपाली चाकणकर यांची ओळख आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्यावर आता ठाकरे सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. आता रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

गेले अनेक दिवस राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाच्या नावाची वर्णी लागणारयाकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आता ही जबाबदारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना सोपवण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शेतकरी कुटुंबात रूपाली चाकणकर यांचा जन्म

दौंडमधील शेतकरी कुटुंबात रूपाली चाकणकर यांचा जन्म झाला. पुण्यातील हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. तसेच त्यांचं पुढील शिक्षणासाह हडपसर येथे झाले.पुढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला.

ADVERTISEMENT

मागील दीड ते दोन वर्ष हे पद रिक्त होतं. विरोधकांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर होत असलेल्या टीकांना लक्षात घेता ही जागा लवकरच भरणार अशी चर्चा होती. यापूर्वी विजया रहाटकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या.

ADVERTISEMENT

सोशल मीडियावर सक्रिय

रुपाली चाकणकर सोशल मीडियावर सतत सक्रिय आहेत सोबतच त्या महिला अत्याचार प्रकरणावर नेहमी भाष्य करत असतात. रुपाली चाकणकर सोशल मीडियावर सतत सक्रिय आहेत सोबतच त्या महिला अत्याचार प्रकरणावर नेहमी भाष्य करत असतात. अवघ्या दीड ते दोन वर्षाच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील राज्यभरातील महिलांच्या हक्कासाठी न्याय मिळवून देणाऱ्या आणि त्यांच्या हक्कासाठी लढणारा या चेहऱ्याकडे पाहिलं जात आहे. तो चेहरा म्हणजे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर.

रस्त्यावरची आंदोलनं ते भव्य व्यासपीठ आणि हजारोंच्या गर्दीत रुपाली चाकणकर यांचं वेगळेपण पाहायला मिळतं. विषयांची मुद्देसूद मांडणी, सडेतोड उत्तर, करारीपणा, कधी कोट्या करुन विरोधकांना नामोहरम करणं यासाठी रुपाली चाकणकर ओळखल्या जाऊ लागल्या आहेत

महिला प्रश्नांवर खंबीर भूमिका

नगरसेविका ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. रुपाली चाकणकर यांची ओळख महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेललीय. संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन राष्ट्रवादीचं महिला संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर राहिला आहे. रुपाली चाकणकर यांच्याशी जेव्हा आमचं बोलणं झालं त्यावेळी त्यांचा राजकीय प्रवास उलगडत गेला. आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची ही मोठी जबाबदारी रुपाली चाकणकर यांच्यावर आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT