राज्यसभा निवडणुकीत महाडिक जिंकणार, मोठा नेता पडणार; पाटलांनी महाविकास आघाडीला दिला प्रस्ताव
–दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर ‘राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीनं त्यांचा एक उमेदवार मागे घ्यावा, अन्यथा त्यांचा मोठा उमेदवार पडू शकतो.’ असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटलांचा हे वक्तव्य म्हणजे शिवसेनेच्या संजय राऊतांना इशारा तर नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीनही उमोदवार विजयी […]
ADVERTISEMENT

–दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर
‘राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीनं त्यांचा एक उमेदवार मागे घ्यावा, अन्यथा त्यांचा मोठा उमेदवार पडू शकतो.’ असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटलांचा हे वक्तव्य म्हणजे शिवसेनेच्या संजय राऊतांना इशारा तर नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीनही उमोदवार विजयी होणार असल्याची खात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसंच या निवडणुकीत भाजप घोडेबाजार करणार नाही. महाविकास आघाडीनं त्यांचा एक उमेदवार मागे घ्यावा, अन्यथा एखाद्या मोठ्या पक्षाचा मोठा उमेदवार पराभूत होऊ शकतो. असा इशाराही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्यानं घोडेबाजार होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्यात सहाव्या जागेसाठी निवडणूक रंगणार आहे. दोन्ही उमेदवारांना विजयासाठी 10 ते 12 मतांची गरज असल्यामुळं, घोडेबाजार होण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.