Bigg Boss 16 : बिग बॉस 16 कोण जिंकणार? दोन स्पर्धक आघाडीवर
bigg boss 16 grand Finale : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि हिट ठरलेल्या रियालिटी शो बिग बॉस 16चा (Bigg Boss 16) ग्रँड फिनाले आज (12 जानेवारी) आहे. सोशल मीडियावर चाहते आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा देताना दिसत आहे. ग्रँड फिनालेची तयारी पूर्ण झाली असून, वेगळ्या अंदाजात विजेत्याचं नाव जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळे बिग बॉसच्या 16 सीझनचा विजेता […]
ADVERTISEMENT
bigg boss 16 grand Finale : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि हिट ठरलेल्या रियालिटी शो बिग बॉस 16चा (Bigg Boss 16) ग्रँड फिनाले आज (12 जानेवारी) आहे. सोशल मीडियावर चाहते आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा देताना दिसत आहे. ग्रँड फिनालेची तयारी पूर्ण झाली असून, वेगळ्या अंदाजात विजेत्याचं नाव जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळे बिग बॉसच्या 16 सीझनचा विजेता कोण होणार, याची उत्सुकता बिग बॉस प्रेमींमध्ये आहे. स्पर्धेत दोन नावं आघाडीवर आहेत.
ADVERTISEMENT
‘बिग बॉस 16’ चा ग्रँड फिनाले आज 12 फेब्रुवारीला होणार आहे. कलर्स चॅनलवर (Colors TV) संध्याकाळी ७ वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू होईल. तसंच, बिग बॉस प्रेमी Voot अॅपवर लाइव्ह देखील पाहू शकतात.
Ramesh Bais: नगरसेवक ते महाराष्ट्राचे राज्यपाल, कोण आहेत रमेश बैस?
हे वाचलं का?
bigg boss 16 : टॉप 5 मध्ये पोहोचलेले स्पर्धक कोण?
बिग बॉसच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी सर्वच स्पर्धकांनी मेहनत घेतलीय. पण, टॉपमध्ये शिव ठाकरे, प्रियंका चहर चौधरी, शालीन भनोत, एमसी स्टॅन आणि अर्चना गौतम यांनाच जागा मिळवता आली. या पाचपैकी एकाच्या डोक्यावर बिग बॉसचा ताज दिसणार आहे.
ADVERTISEMENT
Bhagat Singh Koshyari : कोश्यारींचा राजीनामा मंजूर, बैस नवे राज्यपाल
ADVERTISEMENT
बिग बॉस 16 – कोण मारणार बाजी?
बिग बॉसचा ग्रँड फिनाले यावेळी चर्चेत आहे. सोशल मीडियावर चाहते त्यांच्या आवडीच्या स्पर्धकाला मत देत आहेत. सोशल मीडिया ट्रेडनुसार, फिनालेमध्ये ट्रॉफी जिंकण्याची शर्यत शिव ठाकरे आणि प्रियंका चहर चौधरीमध्ये दिसत आहे. प्रियांका आणि शिवकडे सीझन 16 मधील सर्वात बेस्ट प्लेयर म्हणून पाहिलं जातंय. दोघंही सुरुवातीपासूनच मनापासून खेळत आहेत. प्रियांका आणि शिव या दोघांनीही नेहमीच फ्रंटफूटवर राहून प्रत्येक मुद्दा मांडले आहे, प्रेक्षकांनाही त्यांचा खेळ आवडला आहे. प्रियांका आणि शिव ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीत एकमेकांना काट्याची टक्कर देत आहेत. या दोघांपैकी एक बिग बॉसचा विजेता होईल, असे मानले जात आहे.
bigg boss 16 च्या फिनालेत स्पर्धकांसह ‘या’ खास पाहुण्यांची ग्रॅंड एन्ट्री!
ग्रॅंड फिनालेत अर्चना गौतम आणि शालीन भानोत यांचा दमदार परफॉर्मन्स असेल. याशिवाय प्रियांका, शिव आणि एमसी स्टॅन हे देखील परफॉर्म करणार आहेत. सनी देओल आणि अमिषा पटेल ‘गदर 2’ च्या प्रमोशनसाठी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी कृष्णा अभिषेक आपल्या विनोदाने धम्माल करणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT