नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आणि लगेच केला सत्तास्थापनेचाही दावा
बिहारच्या राजकारणात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भूकंप घडवला आहे. नितीश कुमार यांनी एनडीएतून बाहेर पडत मुख्यमंत्रीपद सोडलं आहे. तर दुसरीकडे राजद आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्यांनी सत्ता स्थापनेचा दावाही केला आहे. आपल्याकडे १६० आमदारांचा पाठिंबा आहे, असं नितीश कुमार यांनी सांगितलं आहे. बिहारचे राज्यपाल फागू चौहान (Phagu Chauhan) यांना नितीश कुमार भेटले आणि त्यांच्याकडे राजीनामा दिला. […]
ADVERTISEMENT
बिहारच्या राजकारणात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भूकंप घडवला आहे. नितीश कुमार यांनी एनडीएतून बाहेर पडत मुख्यमंत्रीपद सोडलं आहे. तर दुसरीकडे राजद आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्यांनी सत्ता स्थापनेचा दावाही केला आहे. आपल्याकडे १६० आमदारांचा पाठिंबा आहे, असं नितीश कुमार यांनी सांगितलं आहे. बिहारचे राज्यपाल फागू चौहान (Phagu Chauhan) यांना नितीश कुमार भेटले आणि त्यांच्याकडे राजीनामा दिला.
ADVERTISEMENT
नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांना नेमकं काय सांगितलं?
नितीश कुमार यांनी भाजपपासून दूर जात एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेतली. फागू चौहान यांच्या भेटीनंतर नितीश कुमार माध्यमांशी बोलताना म्हणाले, “एनडीएच्या सरकारमध्ये जे मुख्यमंत्रीपद मला मिळालं होतं ते मी सोडलं आहे. मी राज्यपालांना (फागू चौहान) भेटून राजीनामा दिला आहे. तेजस्वी यादव तसंच काँग्रेसच्या पाठिंब्यावर मी पुन्हा सरकारमध्ये येणार आहे. राबडी देवी यांच्या निवासस्थानी नव्या सरकारसंदर्भात आम्ही बैठक करणार आहोत”, असंही नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.
भाजपवर नितीश कुमार यांची कडाडून टीका
जदयूच्या आमदारांची बैठक नितीश कुमारांनी बोलावली होती त्या बैठकीत त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. भाजपने आपल्याला संपवण्याचा कट रचला होता. भाजपकडून आपल्याला संपवण्याचे प्रयत्न सुरू होते असंही नितीश कुमार यांनी म्हटलं होतं.
हे वाचलं का?
जदयू आणि भाजपची युती का तुटली?
बिहारमध्ये जो राजकीय भूकंप झाला त्याचं कारण नेमकं काय आहे? हा प्रश्न उपस्थित होतोच आहे. नितीश कुमार हे महाआघाडी सोडून भाजपसोबत आले होते. तरीही त्यांनी बंडखोरी केली. नितीश कुमार यांच्या नाराजीचं मुख्य कारण फ्री हँड न मिळणं आहे. त्यामुळेच ते दिल्ली सरकारच्या कार्यक्रमांमध्येही कधी सहभागी झाले नाहीत. त्यांनी राज्यातही भाजपच्या नेत्यांसोबत सुरक्षित अंतर ठेवलं. RCP सिंह सारख्या नेत्यांनी जदयूऐवजी भाजपशी केलेली सलगी नितीश कुमार यांना मुळीच आवडली नाही. त्यामुळे त्यांच्या मनात बंडाची ठिणगी पडली.
RCP सिंह यांचा नेमका विषय काय?
जदयूचे माजी अध्यक्ष RCP सिंह हे केंद्र सरकारमध्ये मंत्री होते. त्यांना जदयूमध्ये भाजपचा माणूस म्हणून पाहिलं जाऊन लागलं. कारण नितीश कुमार यांची मर्जी जाणून न घेता ते केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाले होते. नितीश कुमार यांनी त्यांना पुन्हा राज्यसभेवरही पाठवलं नाही. त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिपद सोडावं लागलं. त्यानंतर त्यांनी पक्षही सोडला. या चॅप्टरनंतर भाजप आणि जदयू म्हणजेच नितीश कुमार यांच्यातलं अंतर वाढत गेलं. त्याचा परिणाम आता भाजपला धक्का देण्यात झाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT