Devendra Fadnavis : “भाजप आणि शिवसेना ओरिजनल मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार”
मुंबई (Mumbai) महापालिकेसह राज्यातल्या (Maharashtra) १८ महापालिका निवडणुका (Elections )लवकरच होणार आहेत. कदाचित दिवाळीच्या (Diwali) आसपास या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल. या निवडणुकांसाठी भाजप (BJP) आणि मनसेची (MNS) युती होईल अशा चर्चा होत आहेत. अशात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर देत भूमिका स्पष्ट केली. CM शिंदेंच्या दसरा […]
ADVERTISEMENT
मुंबई (Mumbai) महापालिकेसह राज्यातल्या (Maharashtra) १८ महापालिका निवडणुका (Elections )लवकरच होणार आहेत. कदाचित दिवाळीच्या (Diwali) आसपास या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल. या निवडणुकांसाठी भाजप (BJP) आणि मनसेची (MNS) युती होईल अशा चर्चा होत आहेत. अशात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर देत भूमिका स्पष्ट केली.
ADVERTISEMENT
CM शिंदेंच्या दसरा मेळाव्याला व्यासपीठावर राज ठाकरे दिसणार? सदा सरवणकरांचे संकेत
काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?
मनसे आणि भाजपची युती होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले, “तुम्ही तुमची पतंगबाजी सुरू ठेवा. मला हे सगळं पाहून खूप मजा येते. ज्याला जे मनात येतं तशी तो बातमी दाखवतो, अर्थ काढतो. तुम्ही पाहात राहा. मी एकदम स्पष्टपणे सांगतो. भाजप आणि शिवसेना ओरिजनल म्हणजेच शिंदे गट आम्ही एकत्रित निवडणूक लढवणार आणि मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार” अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूरमध्ये विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालं त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हे वाचलं का?
उद्धव ठाकरेंचा ‘गट’; आम्हीच खरी शिवसेना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा
मिशन बारामतीविषयी काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?
भाजपचं मिशन इंडिया आहे. महाराष्ट्र भाजपचं मिशन महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात बारामती येतेच त्यामुळे आमचं मिशन बारामती वगैरे नाही आमचं मिशन महाराष्ट्र आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं. आमच्यासाठी प्रत्येक सीट महत्त्वाची आहे आम्ही त्याच अनुषंगाने काम करतो आहोत असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
भाजपच्या रणनीतीविषयी काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?
मी असं सांगितलं की कुठलीही निवडणूक लढत असताना आपल्या जीवनातली शेवटची निवडणूक आहे असं समजून जेव्हा तुम्ही झोकुन देता, तेव्हाच आपल्याला ती निवडणूक जिंकता येते… माझे वाक्य फक्त मुंबई महानगरपालिकेसाठी नव्हते, तर निवडणुकीच्या एकंदरीत रणनीती संदर्भात होते…
ADVERTISEMENT
राज ठाकरे यांची भेट देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. तसंच काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या भेटीगाठी भाजपचे नेत्यांनीही घेतल्या. त्यामुळे राज ठाकरेंची मनसे आणि भाजप या दोन पक्षांची युती होऊ शकते अशा बातम्या चालत होत्या. त्याबाबत विचारलं असता आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना ओरिजनल म्हणजेच शिंदे गट आणि भाजप हे एकत्र येऊन निवडणुकीत भगवा फडकवणार असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT