पिंपरीत भाजप नगरसेविकाच्या मुलाचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू
पिंपरीत भाजप नगरसेविकेच्या मुलाने डोक्यात गोळी झाडून घेतली. भाजप नगरसेविका करूणा शेखर चिंचवडे यांचा मुलगा प्रसन्न शेखर चिंचवडे याने डोक्यात गोळी झाडून घेतली. प्रसन्न २१ वर्षांचा होता. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. चिंचवडमध्ये राहत्या घरात त्याने वडिलांच्या लायसन्स पिस्तुलातून डोक्यावर गोळी झाडून घेतली. त्यानंतर प्रसन्नला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारा दरम्यान […]
ADVERTISEMENT
पिंपरीत भाजप नगरसेविकेच्या मुलाने डोक्यात गोळी झाडून घेतली. भाजप नगरसेविका करूणा शेखर चिंचवडे यांचा मुलगा प्रसन्न शेखर चिंचवडे याने डोक्यात गोळी झाडून घेतली. प्रसन्न २१ वर्षांचा होता. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. चिंचवडमध्ये राहत्या घरात त्याने वडिलांच्या लायसन्स पिस्तुलातून डोक्यावर गोळी झाडून घेतली. त्यानंतर प्रसन्नला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
धक्कादायक ! गीता फोगटच्या बहिणीची आत्महत्या
होळीचा सण असल्याने करूणा चिंचवडे यांच्या घरात सगळेजण एकत्र जमले होते. रात्री ९.१५ च्या सुमारास चिंचवडे यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर अचानक गोळी झाडल्याचा आवाज आला त्यानंतर कुटुंबातले सगळेच सदस्यांनी वरती धाव घेतली. त्यावेळी त्यांना प्रसन्न रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. प्रसन्नने त्याच्या वडिलांच्या पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून घेतली होती. प्रसन्नला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हे वाचलं का?
पोलिसांना माहिती मिळताच पोलीस या ठिकाणी हजर झाले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. प्रसन्नने डोक्यात गोळी झाडून का घेतली हे अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेत प्रसन्नचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रसन्ने स्वतःवर गोळी का झाडून घेतली याचा शोधही पोलीस घेत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT