उद्धवजी राणे, राज ठाकरेंना शिवसेनेतून का बाहेर जावं लागलं?, फडणवीसांचा तिखट सवाल
मुंबई: ‘उद्धव ठाकरे जर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं?, राज ठाक रेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं?’ असा थेट सवाल विचारत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मी फक्त बाळासाहेबांना दिलेला शब्द पाळण्यासाठी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे.’ असं […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘उद्धव ठाकरे जर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं?, राज ठाक रेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं?’ असा थेट सवाल विचारत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.
‘मी फक्त बाळासाहेबांना दिलेला शब्द पाळण्यासाठी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे.’ असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या दसरा मेळाव्यातील भाषणात म्हटलं होतं. ज्याबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनी थेट असं म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा होती आणि म्हणूनच शिवसेनेते नारायण राणे, राज ठाकरे यांना बाहेर जावं लागलं.
‘उद्धवजी.. राणे, राज ठाकरेंना पक्षातून का जावं लागलं?’
‘सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की, उद्धवजी.. समजा तुम्हाला दिलेला शब्दच पूर्ण करायचा होता तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आलं असतं. दिवाकर रावते होते, सुभाष देसाई होते, एकनाथ शिंदे होते.’










