सोलापूर: ‘राज्यातील मंत्र्यांची लफडी बाहेर येताहेत आणि मुख्यमंत्री…’, कोणी केली बोचरी टीका?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विजयकुमार बाबर, सोलापूर

ADVERTISEMENT

‘महाराष्ट्रातील सामाजिक मंत्र्यांची रंगीन प्रकरणे समाजासमोर येत चाललेली आहेत. रंगीन प्रकरणांमध्ये समाजकल्याणमंत्री व्यस्त आहेत. मुख्यमंत्री या पक्षाला सांभाळ, त्या पक्षाला सांभाळ. यातच व्यस्त आहेत.’ अशी थेट टीका भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी केली आहे.

अनुसूचित जाती जमातीवर होत असलेले अन्याय अत्याचार वाढत चालले असल्याचा आरोप करत आघाडी सरकारला सरकारने अनुसूचित जाती जमाती वरील अन्याय अत्याचार दूर करावे याबाबत बोलताना अमर साबळे यांनी महाविकास आघाडीसह मुख्यमंत्र्यावर बोचरी टीका केली आहे.

हे वाचलं का?

‘महाविकास आघाडीमधील मंत्र्यांची लफडी बाहेर येत चालली आहेत आणि मुख्यमंत्री त्यांची झाकपाक करण्यात व्यस्तं आहेत. त्यामुळेच अनुसूचित जाती-जमातीला दोन वर्षे अध्यक्ष मिळालेला नाही.’ असे टीकेचे बाण साबळे यांनी सोडले आहेत.

अमर साबळे यांनी नेमकी काय केलीए टीका?

ADVERTISEMENT

‘महाराष्ट्रातील सामाजिक मंत्र्यांची रंगीन प्रकरणे समाजासमोर येत चाललेली आहेत. रंगीन प्रकरणांमध्ये समाजकल्याणमंत्री व्यस्त आहेत. मुख्यमंत्री या पक्षाला सांभाळ, त्या पक्षाला सांभाळ. यातच व्यस्त आहेत.’

ADVERTISEMENT

‘वेगवेगळ्या मंत्र्यांची लफडी बाहेर येत चाललेली आहेत. त्यांची झाकपाक करण्यात मुख्यमंत्री व्यस्त असल्यामुळे अनुसूचित जाती जमाती आयोगाला अध्यक्ष नाही.’

‘अनुसूचित जाती जमातीवर होत असलेले अन्याय अत्याचार वाढत चालले असल्याचा आरोप करत आघाडी सरकारला सरकारने अनुसूचित जाती जमातीवरील अन्याय अत्याचार दूर करावेत.’ असं आवाहनही यावेळी माजी खासदार अमर साबळे यांनी केले आहे.

‘महाराष्ट्रतील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झालेले आहे. हा दोन वर्षाचा कार्यकाळ म्हणजे अनुसूचित जाती जमातीचे दोन वर्षाचे अन्याय पर्व आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घ्यायचं आणि शोषित , पीडित, वंचित समाजावर अन्याय, अत्याचार होत असताना त्या अन्याय निवारणकडे दुर्लक्ष करायचं काम आणि पाप या सरकारने केलं आहे.’

‘अनुसूचित जाती जमातीला दोन वर्षे अध्यक्ष मिळाला नाही. त्या आयोगाची योग्य मनुष्यबळ आणि निधीची तरतूद नाही. त्यामुळे काम थंड झालेलं आहे. पदोन्नोत्तीतील आरक्षण, अनुसूचित जाती जमातीला जो न्याय मिळाला पाहिजे तो मिळत नाही. त्यामुळे अनुसूचित जाती जमाती वर्गामध्ये प्रचंड संताप आणि उद्रेक आहे.’

सोनिया गांधींसमोर वाकून मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा लागला – नितेश राणेंची बोचरी टीका

‘यामुळेच अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांसाठी आम्ही आता रस्त्यावर उतरणार आहोत.’ असा इशारा माजी खासदार अमर साबळे यांनी सरकारला दिला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT