‘सैतानाच्या तोंडी शांतिपाठ’; उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपचं खोचक उत्तर

मुंबई तक

Bjp Vs Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) तोंडी नैतिक अधःपतनाची चिंता म्हणजे ‘सैतानाच्या तोंडी शांतिपाठ’ असेच म्हणावे लागेल”, असं म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते (BJP spokesperson) केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेंकडून भाजप करण्यात आलेली टीका, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवरून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Bjp Vs Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) तोंडी नैतिक अधःपतनाची चिंता म्हणजे ‘सैतानाच्या तोंडी शांतिपाठ’ असेच म्हणावे लागेल”, असं म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते (BJP spokesperson) केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेंकडून भाजप करण्यात आलेली टीका, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवरून केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलंय की, “आपल्या नेतृत्वातून स्वहस्ते पक्षाचे विसर्जन करून उरल्यासुरल्या सेनेचे प्रमुखपदही गमावलेल्या उद्धव ठाकरेंच्या तोंडी नैतिक अधःपतनाची चिंता म्हणजे ‘सैतानाच्या तोंडी शांतिपाठ’ असेच म्हणावे लागेल.”

“पक्षाचे उरलेले अस्तित्व वाचवून राजकीय कडेलोटापासून स्वतःचा बचाव करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात ज्यांनी प्रत्येक हाताचा आधार शोधला, आणि लहानमोठ्या पक्षांची मते ओरबाडण्याचा स्वार्थीपणा करून अधःपतनाची परिसीमा गाठली, त्यांनी राजकारणातील नैतिक अधःपतनाची चिंता करावी ही आत्मवंचना म्हणावी की आत्मपरीक्षण म्हणावे हा प्रश्नच आहे”, अशा शब्दात उपाध्ये यांनी ठाकरेंना उत्तर दिलंय.

“२०१४ मध्ये भाजपसोबतची युती मोडून वेगळी चूल मांडणाऱ्या व नंतर सत्तेसाठी गोंडा घोळवत सरकारात सामील होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या राजकीय स्वार्थावर त्यांचा लाऊडस्पीकर असलेल्या संजय राऊत यांनी अगदी अलीकडेच टोमणेबाज आरसा दाखविला आहे. बाळासाहेबांनी थापलेला शेंदूराचा थर आता उघडा पडला असून आतले दगड दिसू लागले आहेत”, असा खोचक टोला उपाध्ये यांनी ठाकरेंना लगावला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp