“सगळे सोडून गेले की हे फोटोग्राफी करायला मोकळे” भाजपची उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांमध्ये टीका
महाराष्ट्रात शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं आहे ते २१ जूनला. २१ जून २०२२ ही महाराष्ट्राच्या राजकारणातली अशी तारीख आहे जी कधीही विसरता येणार नाही. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना बरोबर घेऊन आधी सुरत आणि त्यानंतर गुवाहाटी गाठलं. महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि शिवसेना सत्तेत असताना हे पाऊल एकनाथ शिंदे यांनी उचललं. थेट उद्धव ठाकरेंना आव्हान […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं आहे ते २१ जूनला. २१ जून २०२२ ही महाराष्ट्राच्या राजकारणातली अशी तारीख आहे जी कधीही विसरता येणार नाही. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना बरोबर घेऊन आधी सुरत आणि त्यानंतर गुवाहाटी गाठलं. महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि शिवसेना सत्तेत असताना हे पाऊल एकनाथ शिंदे यांनी उचललं. थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं. त्या दिवसापासून शिवसेना दुभंगली आहे.
शिवसेनेचे अनेक नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी, खासदार हे शिंदे गटात जाताना दिसत आहेत. शुक्रवारी शिवसेनेचे खासदार आणि ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेला योग्य दिशा देत आहेत असं मला वाटतं म्हणून मी त्यांना साथ देतो आहे असं गजानन किर्तीकर यांनी म्हटलं आहे. गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाच्या खासदारांची संख्या १२ वरून १३ झाली आहे. या घडामोडीवरून भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
काय आहे अतुल भातखळकर यांचं ट्विट?
सगळे सोडून गेले की हे फोटोग्राफी करायला मोकळे. असं म्हणत अतुल भातखळकर यांनी एका ओळीत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतं आहे.
सगळे सोडून गेले की हे फोटोग्राफी करायला मोकळे…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 11, 2022