राज्यपालांना विमान प्रवास नाकारला, ठाकरे सरकारवर चिडले भाजप नेते

मुंबई तक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमान नाकारण्यात आल्याने ठाकरे सरकारविरोधात भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विमान प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानागी नाकारली. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरून पुन्हा राजभवनावर येण्याची वेळ ओढवली. या सगळ्या प्रकारानंतर भाजप नेते ठाकरे सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. Maharashtra Guv Bhagat Singh Koshyari was scheduled to go […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमान नाकारण्यात आल्याने ठाकरे सरकारविरोधात भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विमान प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानागी नाकारली. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरून पुन्हा राजभवनावर येण्याची वेळ ओढवली. या सगळ्या प्रकारानंतर भाजप नेते ठाकरे सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत.

काय म्हणाले प्रविण दरेकर?

ठाकरे सरकारने सूड भावनेचा अतिरेक केला असं म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राजकारणातले मतभेद मी नक्कीच समजू शकतो. मात्र राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. सूड भावना त्यांच्यामध्ये किती भरली आहे हे स्पष्ट होतं आहे. कोणत्याही गोष्टी घडल्या की केंद्राकडे बोट दाखवायचं आणि स्वतःचं अपयश झाकायचं हे प्रकार ठाकरे सरकार करतं आहे असंही दरेकर यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

ठाकरे सरकारने जर राज्यपालांना विमान प्रवास नाकारला ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. तुम्ही राज्यपालांना विमानातून खाली उतरवलं जनता तुम्हाला सत्तेतून खाली खेचेल हे विसरू नका असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. या प्रकरणी ठाकरे सरकारने राज्यपालांची क्षमा मागावी अशीही मागणी सुधीर मुनंगटीवार यांनी केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विरूद्ध ठाकरे सरकार हे चित्र महाराष्ट्राने पाहिलं आहेच. 12 आमदारांच्या नियुक्तीवरून ठाकरे सरकारविरूद्ध राज्यपाल हे पाहण्यास मिळालं त्याआधीही राज्यपालांनी ठाकरे सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.आता आज ठाकरे सरकारने राज्यपालांना विमान प्रवास नाकरला आहे ज्यावरून भाजपचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडला निघाले होते. त्यावेळी प्रवासासाठी ते सरकारी विमानात बसले मात्र त्यांच्या या विमान प्रवासाला परवानागी नाकारण्यात आली त्यामुळे ते राजभवनावर परतले. यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

अजित पवार म्हणतात मी अनभिज्ञ

या सगळ्या वरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता मी या सगळ्या प्रकाराबाबत अनभिज्ञ आहे अशी एका ओळीची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

हे पण पाहा- राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ पण शेतकऱ्यांना नाही असं का म्हणाले होते शरद पवार? पाहा व्हिडीओ

हे वाचलं का?

    follow whatsapp