उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीबाबत भाजपचे नेते काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवारी प्रसिद्ध झाला. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध महत्वाच्या विषयांवर भाष्य केले. मात्र आता संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीवर चौफेर टीका होत आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुलाखतीबाबत प्रश्न विचारला असता ‘मी फिक्स मॅच बघत नाही, मी लाईव्ह मॅच पाहतो, खरी मॅच पाहतो. जर एखादी फिक्स मॅच आहे तर त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची असं फडणवीस म्हणाले.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर प्रसाद लाड यांची टीका

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी राऊतांना दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांचं बंड, भाजपची भूमिका या सर्व प्रश्नांवर उत्तरं दिली. तर दुसरीकडे मनसे आणि भाजप नेत्यांकडून या मुलाखतीवर टीका होताना दिसत आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, गजानन काळे यांनी मुलाखतीवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता . त्यानंतर आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी सुद्धा स्वतःच्या ट्विटर हँडलवर व्हिडीओ पोस्ट केलाय. ज्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. तसेच एक खोचक टोला देखील लगावला आहे.

‘बॅट पण माझी,बॉल पण माझा,अंपायर पण माझा! म्हणजेच, मुलाखत पण माझी, वृत्तपत्र पण माझं आणि जगप्रसिद्ध संपादक पण माझा.’ असे ट्विटमध्ये लाड यांनी म्हटलंय. अशापद्धतीने मुलाखती देऊन चालणार नाही. 2019 साली पाठीत कोणी खंजीर खुपसला?, असा प्रश्न लाड यांनी उपस्थित केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी 2019 साली नरेंद्र मोदीयांचा फोटो तर देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा वापरून जास्तीत आमदार निवडून आणले, असा दावा प्रसाद लाड यांनी जारी केलेल्या व्हिडिओत केला.

हे वाचलं का?

पुढे बोलताना लाड म्हणाले, पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे नेहमी करतायेत. मात्र, मोदी आणि फडणवीस यांचा चेहरा वापरून 2019 मध्ये त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलंय. त्यामुळे पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा तुम्ही करू नका, महाराष्ट्र ओळखतोय की, पाठीत खंजीर कोणीखुपसला, अशी घणाघाती टीका प्रसाद लाड यांनी केली. आता यावर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांकडून काय प्रत्युत्तर येत, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संजय सिरसाठ यांचीही उद्धव ठाकरेंवर टीका

तर आता बंड करून बाहेर पडलेले नेते देखील उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत बोललेल्या मुद्द्यांवर बोलत आहेत. शिंदेगटाचे आमदार संजय सिरसाठ यांनी देखील ठाकरेंच्या मुलाखतीवर भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी बंड केलेल्या आमदारांचा उल्लेख पालापाचोळा असा केला होता. यावर बोलताना सिरसाठ म्हणाले आम्हाला पालापाचोळा म्हणू नका. आम्ही आमची हयात शिवसेना वाढीत घालवली, त्याचा विचार करा. तसेच बाळासाहेबांनंतर कोणीही शिवसेना प्रमुखहोऊ शकत नाही, असं देखील संजय सिरसाठ म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT