Shiv Sena बाबत Nitesh Rane यांचं अत्यंत मोठं वक्तव्य, खा. राऊतांनी जाहीर कार्यक्रमात थोपटली पाठ
वेंगुर्ला: शिवसेना (Shiv Sena) आणि राणे कुटुंबीय (Rane Family) यांच्यातील विळ्या-भोपळ्याचं नातं हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक आहे. त्यामुळेच गेले अनेक वर्ष राणे कुटुंबीय हे सातत्याने ठाकरे कुटुंबीय आणि शिवसेनेच्या नेत्यांशी दोन हात करत आले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनी कायमच शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. पण असं असताना आता […]
ADVERTISEMENT

वेंगुर्ला: शिवसेना (Shiv Sena) आणि राणे कुटुंबीय (Rane Family) यांच्यातील विळ्या-भोपळ्याचं नातं हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक आहे. त्यामुळेच गेले अनेक वर्ष राणे कुटुंबीय हे सातत्याने ठाकरे कुटुंबीय आणि शिवसेनेच्या नेत्यांशी दोन हात करत आले आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनी कायमच शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. पण असं असताना आता आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी एक अत्यंत मोठं वक्तव्य केलं आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेचे आज उद्घाटन करण्यात आले त्यावेळी भाजप आमदार नितेश राणे, रविंद्र चव्हाण तर शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर हे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसून आले. याच कार्यक्रमात नितेश राणे यांनी असं वक्तव्य केलं आहे की, ‘पक्षाने आदेश दिल्यास आम्ही शिवसेनेशी देखील जुळवून घेऊ.’ त्यांच्या याच वक्तव्यामुळे उपस्थितीच्या भुवया देखील उंचावल्या.