उदयनराजेंचं NCP सोबत अंडरस्टँडिंग; शिवेंद्रसिंहराजेंना का आली शंका?
–इम्तियाज मुजावर, सातारा “छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांचं राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर अंडरस्टँडिंग असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात भाष्य केले नसावं. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी कोणावर टीका करायची. त्यांनी कुणाबद्दल बोलायचं ते मी सांगू शकत नाही,” असं सांगत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी हल्लाच चढवला. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “भाजप प्रवक्ते आणि राज्यपाल यांच्या विरोधात उदयनराजे आक्रमक झाले होते. […]
ADVERTISEMENT

–इम्तियाज मुजावर, सातारा
“छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांचं राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर अंडरस्टँडिंग असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात भाष्य केले नसावं. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी कोणावर टीका करायची. त्यांनी कुणाबद्दल बोलायचं ते मी सांगू शकत नाही,” असं सांगत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी हल्लाच चढवला.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “भाजप प्रवक्ते आणि राज्यपाल यांच्या विरोधात उदयनराजे आक्रमक झाले होते. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विरोधात उदयनराजे यांची चुपी का?,” असा सवाल शिवेंद्रसिंह राजेंनी उपस्थित केला आहे.
उदयनराजे भाजपवर नाराज आहेत का? राष्ट्रवादीबरोबर उदयनराजे जाणार का? याबद्दल तर्कवितर्क लावले जात असून, याचं अनुषंगाने शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला.