शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवणाऱ्या मलिकांना उद्धव ठाकरे वाचवत आहेत- आमदार श्वेता महाले
सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून होत असलेली कारवाई हा सध्या राज्याच्या राजकारणातला चर्चेचा विषय ठरला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊ इब्राहीमच्या हस्तकांसोबत मालमत्तेचा व्यवहार केल्याप्रकरणात मंत्री नवाब मलिक हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. या मुद्द्यावरुन प्रत्येक दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका होते आहे. अशातच भाजप आमदार श्वेता महाले यांनी शिवसेनेला टीकेचं लक्ष्य […]
ADVERTISEMENT

सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून होत असलेली कारवाई हा सध्या राज्याच्या राजकारणातला चर्चेचा विषय ठरला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊ इब्राहीमच्या हस्तकांसोबत मालमत्तेचा व्यवहार केल्याप्रकरणात मंत्री नवाब मलिक हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. या मुद्द्यावरुन प्रत्येक दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका होते आहे. अशातच भाजप आमदार श्वेता महाले यांनी शिवसेनेला टीकेचं लक्ष्य केलं आहे.
शिवसेनेचं हिंदुत्व हे आता फक्त दाखवण्यापूरतं राहिलेलं आहे. ज्या शिवसेना भवनात नवाब मलिकांनी बॉम्बस्फोट केले त्यांनाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाचवत असल्याचा गंभीर आरोप श्वेता महाले यांनी केला.
काय म्हणाल्या श्वेता महाले?
शिवसेनेचं हिंदुत्व हे आता फक्त दाखवण्यापूरतं राहिलेलं आहे. ज्या दिवशी ते काँग्रेससोबत सत्तेत बसले त्यादिवशीच त्यांनी हिंदुत्वाला लाथ मारली आहे. दोन वर्षांमध्ये आपण पाहत आहोत की सतत एका विशिष्ठ विचारधारेच्या लोकांना संरक्षण दिलं जातं, त्यांनाच योजना दिल्या जातात. ज्या हिंदुत्वाचा विचार घेऊन बाळासाहेब लढले, मोठे झाले तो विचार आताचे पक्षप्रमुख विसरलेले आहेत.