सोलापूर : आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक, घोंगडी बैठकीवरुन परतताना झाला हल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर आज सोलापूर येथे दगडफेक झाली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पडळकर सध्या राज्यभरात घोंगडी बैठका घेत आहेत. सोलापुरातील श्रीशैल नगरातील महादेव मंदिराजवळ ही घटना घडली.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार Activa गाडीवरुन आलेल्या दोघांनी पडळकरांच्या गाडीवर मोठे दगड फेकले, ज्यात त्यांच्या गाडीच्या काचेच नुकसान झालंय. या हल्ल्यात पडळकर किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. दडगफेक केल्यानंतर हे दोन तरुण तिकडून पसार झालेत.

‘शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही’,
आमदार पडळकरांची पवारांवर विखारी टीका

हे वाचलं का?

दरम्यान या घटनेनंतर पडळकरांनी पुन्हा एकदा पवारांवर हल्लाबोल केला आहे. “पवारांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी कशी चालते हे आता राज्याला माहिती आहे. माझी इथे कोणाशीही ओळख नाही किंवा शत्रुत्व नाही, तरीही कोणाला तरी पुढे करुन माझ्यावर हल्ला झाला आहे. माझा आवाज असा बंद होणार नाही, उद्या मला गोळ्या घातल्यात तरीही मी मागे हटणार नाही.”

OBC आरक्षणानंतर घेतलेल्या भूमिकेनंतर आता पवारांचे बगलबच्चे बिथरले आहेत. रोज मला मोबाईल धमक्यांचे मेसेज येतात. गेल्या ५० वर्षांपासून त्यांची अशीच दादागिरी सुरु आहे, पण मी माझा लढा कुठेही थांबवणार नाही असं म्हणत पडळकरांनी पवारांना आव्हान दिलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT