‘कटाची स्क्रिप्ट प्रभादेवीच्या कार्यालयात…?’, शेलारांचा सेनेवर पलटवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ashish Shelar Latest News : विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. याच विधानावर भाजप-बाळासाहेबांची शिवसेनेनं बोट ठेवलं, आंदोलन केलं. त्यावरून ठाकरेंनी भाजपवर पलटवार केला आणि शिंदे-फडणवीसांना सवाल केला. सामना अग्रलेखातून ठाकरेंनी केलेल्या टीकेला आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय.

ADVERTISEMENT

विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून सत्ताधाऱ्यांच्या रडारवर आले आहेत. भाजपने रस्त्यावर उतरत अजित पवारांचा निषेध केला. भाजपनं अजित पवारांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शिवसेना अजित पवारांच्या मदतीला धावलेत आणि राज्यपालांना अण्णाजी पंत म्हणत भाजपवर टीका केली.

शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केलेल्या टीकेला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी उत्तर दिलंय.

हे वाचलं का?

आशिष शेलारांनी ट्विटमधून शिवसेनेवर टीकास्त्र डागलंय. शेलार म्हणतात, “काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला “टकमक टोकाकडे” घेऊन जात आहेत ! आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ आहे”, असं शेलार म्हणाले.

अजित पवारांविरुद्ध भाजप रस्त्यावर! ठाकरे उतरले मैदानात, चढवला हल्ला

ADVERTISEMENT

संजय राऊत अण्णाजी पंत? शेलार काय म्हणाले?

सामना अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आलीये. सामनाचा अग्रलेख कार्यकारी संपादक असलेले संजय राऊत लिहितात. आशिष शेलारांनी राऊतांवरच निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन चाकी सरकार आल्यापासून नियोजनबद्ध कट रचलाय? म्हणूनच छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते हे सांगणाऱ्या अजित पवार यांची आज सामनाने पाठराखण केलीये? या कटाची स्क्रिप्ट प्रभादेवीच्या कार्यालयात बसून ‘अण्णाजी पंत’ यांनी लिहिलीये?”, असे प्रश्न शेलारांनी उपस्थित केले आहेत.

ADVERTISEMENT

चित्रा वाघांचा उर्फीला इशारा, सुषमा अंधारेंनी केली कोंडी, म्हणाल्या…

“छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते- अजित पवार, औरंगजेब क्रूर, हिंदूद्वेष्टा नव्हता -जितेंद्र आव्हाड, दाऊदशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांच्या पक्षाच्या नेत्यांची ही विधाने महाराष्ट्राने हलक्यात घ्यावी का? ही एक ‘औरंगजेबी’ चाल तर नाही ना?”, अशी शंका आशिष शेलारांनी प्रत्युत्तर देताना उपस्थित केलीये.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT