सचिनच्या समर्थनार्थ भाजप पुढे, फडणवीस म्हणतात..
मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडूलकरने काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमवीर केलेल्या ट्विटवरून निर्माण झालेला वाद अजूनही संपायचं नाव घेत नाहीये. अजुनही त्याला मोठ्या प्रमाणावर रोषाला सामोरं जावं लागतंय. त्यातच आता केरळमधल्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिनच्या पोस्टला हे असं काळं तेल वाहून आपला निषेध नोंदवल्याची घटना घडलीय. त्यानंतर आता भाजप सचिनच्या पाठिंब्यात पुढे सरसावल्याचं दिसून येतंय. विरोधी […]
ADVERTISEMENT
मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडूलकरने काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमवीर केलेल्या ट्विटवरून निर्माण झालेला वाद अजूनही संपायचं नाव घेत नाहीये. अजुनही त्याला मोठ्या प्रमाणावर रोषाला सामोरं जावं लागतंय. त्यातच आता केरळमधल्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिनच्या पोस्टला हे असं काळं तेल वाहून आपला निषेध नोंदवल्याची घटना घडलीय. त्यानंतर आता भाजप सचिनच्या पाठिंब्यात पुढे सरसावल्याचं दिसून येतंय. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिनच्या बाजूने ट्विट करत ठाकरे सरकारला सवाल केलाय. तर राम कदम, संबित पात्रा यांनीही सचिनच्या समर्थनार्थ ट्विट केली आहेत.
ADVERTISEMENT
India’s sovereignty cannot be compromised. External forces can be spectators but not participants.
Indians know India and should decide for India. Let's remain united as a nation.#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 3, 2021
3 फेबुवारीला सचिन तेंडूलकरने देशाच्या अखंडत्वाबद्दल ट्विट केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर सचिनविरोधी वातावरण निर्माण झालं. त्यातच आता केरळमधल्या कोचीत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिनच्या पोस्टला काळं तेल वाहून आपला निषेध नोंदवला आहे. त्याचीच दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी, केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे भूषण असलेले, भारतरत्न आणि मराठी माणसाचे अभिमान असलेले सचिन तेंडूलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?, असा सवाल करणारं ट्विट केलं आहे. तर भाजपच्या संबित पात्रा यांनी काँग्रेसवर टीका केलीय, काँग्रेस पैसे घेऊन ट्विट करणा-या सेलिब्रिटिजना पाठीशी घालून खरे देशभक्त असलेल्या भारतरत्नाची प्रतारणा करत असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे.
केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे भूषण असलेले,
भारतरत्न आणि मराठी माणसाचे अभिमान असलेले सचिन तेंडूलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का ?@sachin_rt https://t.co/oEh9t4LzXp— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 5, 2021
तर राम कदम यांनीही, भारतरत्न, देशाचे भूषण असलेले सचिन तेंडूलकर यांचा असा अपमान होतोय. सचिनवर जिवापाड प्रेम करणार्या स्वर्गीय बाळासाहेबनी हे कधीही सहन केले नसते. शिवसेना आणी क्रिकेटवर प्रेम करणारे मा.शरद पावरजी सचिनचा असा अपमान करणार्यांना समर्थन करणार की जोड्याने बडवनार? सचिनचा हा अपमान महाराष्ट्रचा मराठी माणूस अन देश कधीही सहन करणार नाही. सचिन तुमच्या सोबत सारा देश आहे #IndiaAgainstPropaganda #IndiaTogether #JaiJawanJaiKissan, असं ट्विट केलंय.
हे वाचलं का?
भारतरत्न , देशाचे भूषण असलेले @sachin_rt सचिन तेंडूलकर यांचा असा अपमान होतोय . सचिनवर जिवापाड प्रेम करणार्या स्वर्गीय बाळासाहेबनी हे कधीही सहन केले नसते. शिवसेना आणी क्रिकेटवर प्रेम करणारे मा @PawarSpeaks जी सचिनचा असा अपमान करणार्यांना समर्थन करणार की जोड्याने बडवनार ? pic.twitter.com/BFaqqnEv6k
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) February 6, 2021
दुसरीकडे केरळमधले काही सोशल मीडिया युजर्स याच मुद्द्यावरून तर थेट रशियाची टेनिसपटू मारिया शारापोव्हाची माफी मागत असल्याचं दिसून येतंय. मारियाने २०१५ साली एका मुलाखतीत सचिन तेंडुलकरला ओळखत नसल्याचे म्हटले होते. तेव्हा भारतीय लोकांनी तिच्यावर सडकून टीका केल्या होत्या. पण सचिनच्या ट्विटनंतर मात्र आता सोशल मीडिया युजर्स तिची त्या घटनेबद्दल माफी मागायला सुरूवात केलीय. विशेष म्हणजे या माफी मागण्या-यांमध्ये केरळ मधल्या नागरिकांची संख्या जास्त असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी किती वाढतं आणि राजकीयस्तरावरून यावर कोणत्या प्रतिक्रिया दिल्या जातात हे पाहण महत्त्वाचं ठरेल.
हा व्हिडिओ देखील पहा…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT