“उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली” वरूण सरदेसाईंचा दावा
उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली अशी टीका युवासेनेचे सचिव वरूण देसाई यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षातील क्रमांक दोनचे नेते होते. त्यांचे पक्षातील सगळ्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांसोबत चांगले संबंध होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते एकनाथ शिंदे मानले जात होते. तरीही त्यांनी बंडखोरी केली असं […]
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली अशी टीका युवासेनेचे सचिव वरूण देसाई यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षातील क्रमांक दोनचे नेते होते. त्यांचे पक्षातील सगळ्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांसोबत चांगले संबंध होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते एकनाथ शिंदे मानले जात होते. तरीही त्यांनी बंडखोरी केली असं वरूण सरदेसाईंनी केली आहे. उस्मानाबादमध्ये ते बोलत होते.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे राज ठाकरेंना दसरा मेळाव्याला बोलवणार? मुख्यमंत्री म्हणाले..
नेमकं काय म्हणाले आहेत वरूण सरदेसाई?
उद्धव ठाकरे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले असते तर २०२४ ला पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार होऊ शकतात. तसंच सगळ्या भाजपविरोधी पक्षांचा त्यांचा पाठिंबा मिळाला असता आणि ते पंतप्रधान होतील या भीतीने भाजपने शिवसेना फोडली असा दावा वरूण सरदेसाईंनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपचा हात पकडला. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत शिवसेनेच्या ४० आमदारांना घेऊन बंड केलं. त्यामुळेच महाविकास आघाडीच सरकार कोसळलं. महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन करण्यामागे भाजपचा हात होता हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्य केलं आहे असं म्हणत शिवसेना का फोडली याचं कारण वरूण सरदेसाईंनी सांगितलं आहे.
हे वाचलं का?
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय लांबणीवर; घटनापीठासमोरील पुढील सुनावणी 27 सप्टेंबरला
२१ जूनला महाराष्ट्रातल्या शिवसेनेत बंड
२१ जूनला राज्यात बंड झालं. एकनाथ शिंदे हे ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले. त्यानंतर महाराष्ट्रात असलेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी २९ जूनला राजीनामा दिला. त्यानंतर ३० जूनला एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना गद्दार असं आदित्य ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून संबोधलं जातं आहे.
ADVERTISEMENT
शिवसेना वाचवण्याचं उद्धव ठाकरेंसमोर आव्हान
दुसरीकडे शिवसेननेतले उरलेले आमदार आपल्या बाजूला ठेवण्याचं आणि शिवसेना हा पक्ष आणखी फुटीपासून वाचवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. उद्धव ठाकरे आत्ता त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. तसंच मुंबईची महापालिका ही देखील उद्धव ठाकरे यांना हातातून जाऊ द्यायची नाही. मात्र शिंदे-फडणवीस गटाकडून यासाठीचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच महापालिका निवडणुका जाहीर होतील. या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने राजकारण रंगताना दिसतं आहे.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची लढाई सुप्रीम कोर्टात
आमची शिवसेना खरी आहे असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर माझ्या वडिलांचं नाव वापरू नका असं उद्धव ठाकरेंनी सुनावलं आहे. उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे यांचा हा वाद सुप्रीम कोर्टात गेला आहे. सुप्रीम कोर्टाचा फैसला काय लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT