साधं लग्न केलं तरी मुलं होतात म्हणणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा शाही थाटात साखरपुडा, नेटकऱ्यांनी धारेवर धरलं
Indurikar Maharaj daughter engagement ceremony controversy : साधं लग्न केलं तरी मुलं होतात म्हणणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा शाही थाटात साखरपुडा, नेटकऱ्यांनी धारेवर धरलं
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
साधं लग्न केलं तरी मुलं होतात म्हणणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा शाही थाटात साखरपुडा
इंदुरीकर महाराजांना नेटकऱ्यांचे बेधडक सवाल
Indurikar Maharaj daughter engagement ceremony controversy : आपल्या नर्मविनोदी आणि स्पष्ट भाषाशैलीतून समाजातील अनेक प्रश्नांवर प्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) सध्या त्यांच्या कन्येच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आले आहेत. इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचा साखरपुडा नुकताच संगमनेर (Sangamner) येथील वसंत लॉन्स येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, विविध स्तरांतून त्यावर मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
इंदुरकर महाराजांनी त्यांच्या कीर्तनात साधं लग्न केलं तरी मुलं होतात, असा उपदेश केला होता. मात्र, आता त्यांच्या कन्येचा साखरपुडा शाही थाटात झाल्याने नेटकऱ्यांनी बेधडक सवाल केले आहेत. नेटकऱ्यांनी त्यांच्या आवाजातील व्हिडीओ त्यांच्या कन्येच्या साखरपुड्यातील व्हिडीओला बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून लावले आहेत.
या पार्श्वभूमीवर मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी इंदुरीकर महाराजांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “दुसऱ्यांना संस्कार आणि समज देणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करतात,”
ते पुढे म्हणाले, “आपल्या कीर्तनातून इंदुरीकर महाराज लोकांना सांगतात की मुलांच्या लग्नसमारंभात साधेपणा ठेवा, अनाठायी खर्च करू नका, कर्ज घेऊ नका. मात्र स्वतःच त्यांनी मोठ्या दिमाखात साखरपुडा केल्याने समाजासमोर चुकीचा संदेश गेला आहे. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ या म्हणीप्रमाणे वागले असते, तर त्यांनी खऱ्या अर्थाने आदर्श निर्माण केला असता.”










