सोलापूरमध्ये गुणरत्न सदावर्तेंवर काळं फेकलं; संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून निषेध

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोलापूर : येथे पत्रकार परिषदेदरम्यान अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर काळे फेकण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेड आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हे कृत केल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी मराठा समाजाचा विजय असो, एक मराठा-लाख मराठा, गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध असो, अशा घोषणा देखील देण्यात आल्या.

ADVERTISEMENT

कालही करावा लागला होता विरोधाचा सामना :

शुक्रवारी उस्मानाबाद येथे सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली वेगळा मराठवाडा आणि विदर्भ राज्य करण्याच्या मागणीसंदर्भात संवाद परिषद आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान त्यांच्या स्वागताचे बॅनर्स अज्ञात व्यक्तींकडून फडण्यात आले होते. त्याचबरोबर मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेडच्यावतीने काळे झेंडे दाखवून या मागणीचा निषेध करण्यात आला होता.

काळं फेकल्यानंतर काय म्हणाले सदावर्ते?

संवाद यात्रेमुळे बिळातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि संजय राऊत यांच्या पिलावळांना साळो की पळो करून सोडलेले आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून त्यांना माझा डायलॉग होऊ द्यायचा नाही. छत्रपती शिवरायांचे आम्ही खरे वारसदार मावळे आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मी खरा वारसदार आहे.

हे वाचलं का?

आज संविधानदिनी आशा प्रकारे काही लोकांना सोडून आम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणे सेल्युलर जेलमध्ये दिवस घालवून आलो आहोत. आम्हाला या सगळ्या गोष्टी पाणी कम चाय आहेत. आम्ही त्यांचा धिक्कार करतो, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.

उस्मानाबादमध्ये देखील गुणरत्न सदावर्तेंच्याविरोधात झाले होते निदर्शने

मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणररत्न सदावर्ते यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. सदावर्ते यांच्या उपस्थितीत शुक्रवार सायंकाळी उस्मानाबाद शहरात स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी करणारा परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी सदावर्तेच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या मराठा समाजाच्या तरूणांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. आनंदनगर पोलीसांनी मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. जिल्हा परिषद परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिस बंदोबस्तात संवाद परिषदेचा कार्यक्रम पार पडला.

ADVERTISEMENT

मराठवाडा स्वतंत्र राज्य करण्याची मागणी पुढे

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणी पाठोपाठ आता मराठवाडा स्वतंत्र राज्य करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. याच विषयामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विकासासाठी समर्पक निधी दिला गेला नाही, यामुळे मराठवाड्याला अविकसितपणाचा कलंक लागल्याचा आरोप केला जात आहे.स्वतंत्र मराठवाड्याच्या मुद्द्यावर सदावर्ते म्हणाले की, प्रातिनिधीक स्वरुपातील ही संवाद परिषद यशस्वी झाली आहे. पुढचं पाऊल मुंबईतून आहे. यासाठीचं कार्यालय, न्यायालयीन लाढाई आणि रस्त्यावरील लढाई याबद्दल नियोजन केले जाईल, असं ते म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT