जेव्हा एका कामगार नेत्याने इंदिरा गांधी सरकार हादरवलं होतं…..
जगभरात १ मे हा दिवस कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो. शिकागोमध्ये ४ मे १८८६ ला कामगार वर्ग हा कामाचे आठ तास व्हावेत म्हणून आंदोलन करत होता तेव्हा त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत काही कामगार मारले गेले. यानंतर पहिल्यांदा १ मे हा शिकागोमध्ये कामगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला होता. भारतात लेबर किसान पार्टी […]
ADVERTISEMENT

जगभरात १ मे हा दिवस कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो. शिकागोमध्ये ४ मे १८८६ ला कामगार वर्ग हा कामाचे आठ तास व्हावेत म्हणून आंदोलन करत होता तेव्हा त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत काही कामगार मारले गेले. यानंतर पहिल्यांदा १ मे हा शिकागोमध्ये कामगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला होता. भारतात लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानने १ मे १९२३ ला मद्रासमधून याची सुरूवात केली. आज कामगार दिनाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा कामगार नेत्याची कहाणी ज्याने इंदिरा सरकार हादरवलं होतं.

दत्ता सामंत! डॉक्टर दत्ता सामंत हे नाव होतं जे नाव मुंबईतल्या प्रत्येक मिल कामगाराला ठाऊक होतं. २१ नोव्हेंबर १९३१ ला जन्मलेल्या दत्तात्रय नारायण सामंत यांचा सुरूवातीला कामगार चळवळीशी तसा काही संबंध नव्हता. ते मेडिकलचे विद्यार्थी होते. त्यांनी त्यांचं शिक्षण घेतल्यानंतर पंतनगर, घाटकोपरला डॉक्टर म्हणून प्रॅक्टिसही करू लागले. हीच ती वेळ होती जेव्हा डॉक्टरांना पहिल्यांदाच कामगारांच्या वेदना समजू लागल्या.
मुंबईतला हा तो काळ होता ज्या काळात १० पैकी सात कामगार हे मिल मजूर होते. हळूहळू दत्ता सामंत हे ट्रेड युनियनमध्ये सक्रिय झाले आणि पुढे त्याच युनियनचे ते नेतेही झाले. ऑटोमोबाईल युनियनमध्ये ते जास्त सक्रिय होते. या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी त्यांनी पगार वाढवण्याची मागणी केली. त्यासाठी त्यांनी केलेले संप यशस्वीही झाले.










