तुमचाही विश्वास बसणार नाही अशी बातमी.. स्वत: CM फडणवीसांनी केली शेअर, वीजदर चक्क...
Electricity Rates: आतापर्यंत आपण अनेकदा ऐकलं आहे की, वीजेचे दर वाढणार. खरं तर ही राज्यातील जनतेसाठी आता सामान्य बाब झाली होती. पण आता चक्क वीज दरात 26 टक्क्यांनी कपात होणार अशी माहिती स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: कधी काळी अनेक तास लोडशेडिंगला सामोरा गेलेला महाराष्ट्र हा आता वीज निर्मितीच्या बाबतीत जवळजवळ स्वयंपूर्ण झाला आहे. मात्र असं असलं तरी मागील काही वर्षात विजेचे दर हे सातत्याने प्रचंड वाढले आहेत. मागील काही वर्षात वीज महामंडळाच्या खासगीकरणाची चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे वीज दर आणखी वाढतील असा राज्यातील नागरिकांचा कयास होता. मात्र, आता चक्क विजेचे दर कमी होतील असं खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.
विजेचे दर हे थोडेथोडके नव्हे तर तब्बल 26 टक्क्यांनी कमी होतील अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी केली आहे. जी महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी अशी बातमी आहे.
26 टक्के वीजदर कमी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची सोशल मीडियावरील पोस्ट जशीच्या तशी
राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने ( MIRC)हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
हे ही वाचा>> Haldi in Water Trend: हळद पाण्यात टाकण्याचा भलताच ट्रेंड, अचानक कसा सुरू झाला?
साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर 10 टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे.