Vaccination Blood Clotting: चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्यास होऊ शकतात रक्ताच्या गुठळ्या: स्टडी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आंतरराष्ट्रीय स्तरावर नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, कोरोना लसीकरणादरम्यान (Vaccination) जर चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन (injected incorrectly) देण्याचे तंत्र अवलंबले गेले तर लसीकरणानंतर संबंधित व्यक्तीच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या (Blood clotting) होऊ शकतात. जर्मनीतील म्युनिक विद्यापीठ आणि इटलीमधील एका संस्थेच्या संयुक्त क्लिनिकल चाचणीत हे उघड झाले आहे.

आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, जर इंजेक्शन देण्याचे तंत्र चुकीचे असेल तर ही लस स्नायूंमध्ये नव्हे तर रक्त प्रवाहात जाऊ शकते. जर अशावेळी रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राजीव जयदेवन यांचेही असे मत आहे.

ते म्हणतात की, जर इंजेक्शनची सुई ही स्नायूपर्यंत खोलवर पोहोचली नाही किंवा ती रक्तवाहिनीला धडकली असेल तर अशा स्थितीत लस ही रक्त प्रवाहात जाऊ शकते. प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस दिली तर असे प्रकार मात्र कमी होतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोणत्या कोरोना प्रतिबंधक लसीनंतर असे प्रकार आले समोर?

डॉ. जयदेव म्हणतात की, जेव्हा असे होते तेव्हा लस योग्य प्रकारे शोषली जात नाही आणि ती त्वचा आणि स्नायू यांच्यामध्ये असलेल्या त्वचेखालील थरातून रक्तवाहिन्यांमधे येऊ शकते. स्पुटनिक व्ही, जॉन्सन अँड जॉन्सन आणि एझेड अ‍डेनोव्हायरस लस दिल्यानंतर जगभरात रक्ताच्या गुठळ्या होण्याचे काही घटना आढळून आल्या आहेत.

ADVERTISEMENT

जर्मनीतील म्युनिक विद्यापीठ आणि इटलीमधील एका संस्थेने केलेल्या अभ्यासात असेही समोर आले आहे की, जर अ‍डेनोव्हायरस लस जर रक्तप्रवाहात दिली गेल्यास अशी अडचण उद्भवू शकते. ही स्टडी अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि फायझरसारख्या लस दिलेल्या लोकांवर करण्यात आली आहे. ज्यांना वेगळ्या पद्धतीने लसी देण्यात आली होती.

ADVERTISEMENT

महिला किंवा पुरुष, कोणाला आहे अधिक धोका?

महिला आणि पुरुषांच्या शरीरात रक्त गुठळ्या होणं यामध्ये फरक आहे काय? आतापर्यंत समोर आलेल्या अभ्यासानुसार लसीकरणानंतर स्त्रियांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रकार अधिक दिसून आले आहेत. यामागील कारण काय आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. हाच प्रश्न डॉ राजीव यांना विचारला असता ते म्हणाले की महिलांच्या शरीरात डेल्टॉइड स्नायू दाट असतात.

याचा अर्थ असा की पुरुषांपेक्षा त्यांच्याकडे चरबीचा थर पातळ आहे. याचा अर्थ असा की स्नायूपर्यंत पोचण्यासाठी महिलांनी लस योग्य पद्धतीने दिली जावी. सामान्यत: समान लांबीच्या सुया पुरुष आणि स्त्रियांसाठी वापरल्या जातात. अशा परिस्थितीत, सुई स्नायूपर्यंत पोचण्याची असमर्थता स्त्रियांमध्ये जास्त असू शकते.

Neurological Disorder: कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर काही जणांमध्ये आढळला ‘हा’ दुर्मिळ आजार

लसीच्या दुसऱ्या डोस वेळी हा धोका अधिक आहे?

आतापर्यंतच्या अभ्यासानुसार कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. दुसर्‍या डोसमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका हा 10 पटीने कमी आहे. वास्तविक, कोरोनाच्या पहिल्या डोसच्या आधी शरीर विषाणूंविरूद्ध लढण्यासदेखील पूर्णपणे सक्षम नसतं.

डेन्मार्क स्टेटन्स सीरम संस्थेने लसी कशी दिली जावी यासंबंधी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. तसेच रक्ताच्या गुठळ्या होऊ नये आणि त्यापासून बचाव कसा करावा याबद्दल या मार्गदर्शकामध्ये सविस्तरपणे वर्णन केले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT