मुंबईकरांचं हे टॉर्चर थांबवा; अभिनेते किशोर कदम यांची सरकार आणि पोलिसांना विनंती
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात मास्क सक्ती करण्यात आलेली आहे. मास्क वापरण्याचं आवाहन राज्य सरकारकडून सातत्यानं केलं जात आहे. मुंबईतही मास्क सक्ती असून, विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येतो. मात्र, काहीजणांकडून बेकायदेशीरपणे दंड वसूल केला जात असल्याचे प्रकारही समोर आले असून, अभिनेते किशोर कदम यांनी याकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे. अभिनेते किशोर कदम यांनी फेसबुकवर पोस्ट […]
ADVERTISEMENT
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात मास्क सक्ती करण्यात आलेली आहे. मास्क वापरण्याचं आवाहन राज्य सरकारकडून सातत्यानं केलं जात आहे. मुंबईतही मास्क सक्ती असून, विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येतो. मात्र, काहीजणांकडून बेकायदेशीरपणे दंड वसूल केला जात असल्याचे प्रकारही समोर आले असून, अभिनेते किशोर कदम यांनी याकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे.
ADVERTISEMENT
अभिनेते किशोर कदम यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीकडून दंड वसूल करणाऱ्या लोकांबरोबरच गाडी पार्क करण्याबद्दल आक्षेप घेत काही जणांकडून पैसे घेतले जात असल्याचं म्हटलं आहे.
किशोर कदम यांनी काय म्हटलंय?
हे वाचलं का?
“अंधेरी पूर्व आणि इतर ठिकाणी राखाडी रंगाचे वा साध्या ड्रेस मधील लोक व काही स्त्रिया प्रायव्हेट गाड्यांमधून वा रस्त्यावरून चाललेल्या कुठल्याही माणसाला धरून तोंडावर मास्क असून, तो नाकाच्या वर नव्हता असं सांगत फोटो काढून पैसे उकळत आहेत. अंधेरी पोलीस आणि शासनाच्या लोकांचे या कडे लक्ष जाईल का?.”
“तसंच मुंबईतल्या कुठल्याही गल्लीत साधी गाडी पार्क केली की निळ्या पोषाखातली वा साध्या पोषाखातले लोक येउन कुठलं तरी आयकार्ड दाखवून पे पार्कचे पैसे दादागिरी करत उकळताहेत. हे काय चाललंय सगळं. कृपया शासनाने याकडे लवकरात लक्ष देउन मुंबईकरांचं हे टॉर्चर थांबवावं ही विनंती”, असं किशोर कदम यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
क्लिन अप मार्शलला दंड देण्यापूर्वी ही गोष्ट करा…
ADVERTISEMENT
कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रात मास्क लावणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास २०० रुपये दंड वसूल केला जातो.
क्लिन अप मार्शलला दंडाची रक्कम देण्यापूर्वी नागरिकांनी त्याने गणवेष परिधान केलेला आहे की नाही हे बघावं. त्या गणवेषावर संबंधित विभागाचे नाव व अनुक्रमांक नमूद केला आहे की नाही याचीही खात्री करून घ्यावी. दंड रक्कमेची पावती घ्यावी. यासंदर्भातील तक्रारीसाठी १८००२२१९१६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असं महापालिकेकडून केलं जात आहे.
क्लीन अप मार्शलना दंडाची रक्कम देण्यापूर्वी गणवेष, विभागाचे नाव इत्यादी बाबींची खातरजमा करुन घ्यावीः महानगरपालिकेचे आवाहन
तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२२१९१६ यावर संपर्क साधावा pic.twitter.com/IC4QAY5GKt
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 5, 2022
ही कारवाई करण्यासाठी महापालिकेकडून क्लीन अप मार्शल नेमण्यात आलेले आहेत. या मार्शलला दंड देण्यापूर्वी काही गोष्टीची खात्री करून घेण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलेलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT