Vaccination Scam आरोप प्रकरणी मुंबई महापालिकेने दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
मुंबईतल्या कांदिवली भागात एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या 390 रहिवाशांनी लसीकरण घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी आता मुंबई महापालिकेने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. एवढंच नाही तर या समितीने अहवाल 48 तासांमध्ये सादर करण्यात यावा असंही मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. हा सगळा प्रकार कशामुळे झाला आहे? यामागे कोण आहे हे सगळं शोधणं ही या समितीची […]
ADVERTISEMENT

मुंबईतल्या कांदिवली भागात एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या 390 रहिवाशांनी लसीकरण घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी आता मुंबई महापालिकेने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. एवढंच नाही तर या समितीने अहवाल 48 तासांमध्ये सादर करण्यात यावा असंही मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. हा सगळा प्रकार कशामुळे झाला आहे? यामागे कोण आहे हे सगळं शोधणं ही या समितीची जबाबदारी आहे असंही मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. सध्या या सोसायटीतील सगळ्यांना देण्यात आलेली लसीकरण प्रमाणपत्रं गोळा केली आहेत. गोळा करण्यात आलेली प्रमाणपत्रं कोविन अॅपवरून व्हेरिफाय केली जाणार आहेत.
काय आहे प्रकरण?
लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून मुंबईतल्या हिरानंदानी इस्टेट या सोसायटीत राहणाऱ्या 30 मे रोजी 390 जणांना कोव्हिशिल्ड ही लस देण्यात आली. सोसायटीच्या आवारातच लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. राजेश पांडे नावाचा एक जण यासाठी सोसायटीत आला होता त्याने आपण कोकिलाबेन अंबानी रूग्णालयाचे आहोत असं सोसायटीच्या कमिटी मेंबर्सना सांगितलं. संजय गुप्ता यांनी हे लसीकरण शिबीर घेतल आणि महेंद्र सिंग यांनी सोसायटीतल्या सदस्यांकडून लसींचे पैसे घेतले अशी माहिती आरोप करणाऱ्यांनी दिली आहे.
या इमारतीत राहणारे हितेश पटेल यांनी असं म्हटलं आहे की एका डोससाठी आमच्याकडून 1260 रूपये घेण्यात आले. माझ्या मुलाने याच ठिकाणी झालेल्या लसीकरण शिबीरात लस घेतली. मात्र आम्हाला लस घेतल्यानंतर कोणताही मेसेज आला नाही. तसंच आम्हाला लस घेतल्यानंतर कोणतेही फोटो किंवा सेल्फीही काढू दिले गेले नाहीत. 1260 रूपये एका डोससाठी या प्रमाणे सोसायटीतल्या 390 जणांनी लसीकरण शिबीर आयोजित करणाऱ्याला पाच लाख रूपय दिले.










