अभिनेता संजय दत्तला UAE सरकारकडून मिळाला Golden Visa

मुंबई तक

बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थात संजय दत्त याला UAE सरकारकडून Golden Visa मिळाला आहे. संजय दत्तने याबाबतची माहिती त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून दिली आहे. एवढंच नाही तर गोल्डन व्हिसा दिल्याबद्दल संजय दत्तने युएई सरकारचे आभारदेखील मानले आहेत. संजूबाबाने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती देताना एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये GDRFA दुबईचे डायरेक्टर मेजर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थात संजय दत्त याला UAE सरकारकडून Golden Visa मिळाला आहे. संजय दत्तने याबाबतची माहिती त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून दिली आहे. एवढंच नाही तर गोल्डन व्हिसा दिल्याबद्दल संजय दत्तने युएई सरकारचे आभारदेखील मानले आहेत. संजूबाबाने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती देताना एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये GDRFA दुबईचे डायरेक्टर मेजर जनरल मोहम्मद अहमद अली मर्रि हे अभिनेता संजय दत्त यांना गोल्डन व्हिसा देत आहेत हे दिसून येतं आहे.

का महत्त्वाचा आहे गोल्डन व्हिसा?

गोल्डन व्हिसा लाँग टर्म रेसिडेंस व्हेंट आहे. हा व्हिसा मे 2019 मध्ये पंतप्रधान आणि दुबईच्या शासकांनी दिलेल्या अप्रुव्हलनंतर लागू करण्यात आला. 2020 मध्ये युएई सरकारने या व्हिसाची सुरूवात केली होती. या व्हिसाचा अवधी दहा वर्षांचा असतो. अनेक प्रतिभाशाली लोकांना गल्फ कंट्रीजमध्ये वसवणं हा या व्हिसाचा उद्देश आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp