Raj Kaushal Passes Away: अभिनेत्री Mandira Bedi च्या पतीचे निधन, कार्डियक अरेस्टन घेतले प्राण
मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) आणि तिच्या कुटुंबीयांवर आज (30 जून) अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण मंदिरा बेदीचा पती (Husband) राज कौशल (Raj Kaushal) यांचं बुधवारी सकाळी वयाच्या 49व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन (dies) झाल्याचं वृत्त नुकतंच हाती आलं आहे. मंदिरा बेदी आणि तिच्या चाहत्यांसाठी ही बातमी खूपच धक्कादायक आहे. मंदिरा आणि […]
ADVERTISEMENT

मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) आणि तिच्या कुटुंबीयांवर आज (30 जून) अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण मंदिरा बेदीचा पती (Husband) राज कौशल (Raj Kaushal) यांचं बुधवारी सकाळी वयाच्या 49व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन (dies) झाल्याचं वृत्त नुकतंच हाती आलं आहे.
मंदिरा बेदी आणि तिच्या चाहत्यांसाठी ही बातमी खूपच धक्कादायक आहे. मंदिरा आणि राज यांना दोन मुले आहेत. राज कौशल याचा निधनाचं वृत्त समजताच सोशल मीडियावर सेलिब्रिटी आणि चाहते प्रचंड शोक व्यक्त करत आहेत.
चित्रपट निर्माता ओनिर यांनी निधनाच्या वृत्ताला दिला दुजोरा
चित्रपट दिग्दर्शक ओनिर यांनी राज कौशल यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘खूप लवकर गेलात… आज सकाळी आम्ही चित्रपट निर्माता आणि राज कौशल यांना गमावले आहेत. अतिशय दु:खद… ते माझा पहिला सिनेमा माय ब्रदर निखिल या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक होते. तो त्या लोकांपैकी एक होते ज्यांनी आमच्या दृश्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला पाठिंबा दिला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.’










