टूल किट प्रकरण : निकिता जेकबला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर
टूल किट प्रकरणात निकिता जेकबला जामीन मंजूर करण्यात आला आहे. टूल किट प्रकरणात निकिता जेकब आणि शांतनू मुळूक या दोघांचं अटक वॉरंट एकाच दिवशी काढण्यात आलं होतं. ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिट ट्विट केल्याचा आरोप प्रकरणातील एक नाव म्हणजे निकिता जेकब. निकिता जेकब यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी झाली. ज्यामध्ये निकिता जेकब यांना अटकपूर्व […]
ADVERTISEMENT
टूल किट प्रकरणात निकिता जेकबला जामीन मंजूर करण्यात आला आहे. टूल किट प्रकरणात निकिता जेकब आणि शांतनू मुळूक या दोघांचं अटक वॉरंट एकाच दिवशी काढण्यात आलं होतं. ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिट ट्विट केल्याचा आरोप प्रकरणातील एक नाव म्हणजे निकिता जेकब. निकिता जेकब यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी झाली. ज्यामध्ये निकिता जेकब यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
काय घडलं कोर्टात?
जस्टिस पी.डी. नाईक यांनी ही सुनावणी घेतली. 25 हजारांच्या जातमुचलक्यावर तीन आठवड्यांसाठी हा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांपुढे निकिता जेकबला हजर रहावं लागणार आहे असंही कोर्टात स्पष्ट करण्यात आलं आहे.
हे वाचलं का?
हे पण वाचा – ‘टूल किट’ प्रकरणी चर्चेत असलेली निकिता जेकब कोण आहे?
निकिता जेकबने काय म्हटलं आहे?
ADVERTISEMENT
निकिता जेकबच्या म्हणण्यानुसार टूल किट शेअर करण्यामागे तिचा कोणताही राजकीय, धार्मिक किंवा आर्थिक हेतू नव्हता किंवा कोणाला शारिरीक इजा करण्याचाही तिचा काही हेतू नव्हता. निरनिराळ्या संघटनांशी व्हॉलेंटिअर म्हणून ती जोडली गेली आहे. त्यापैकीच एक असलेल्या एक्स आर व्हॉलेंटिअर पार्टनर्स, फ्रायडेस फॉर फ्युचर यांनी एक व्हीडिओ आणि टूलकिट पाठवलं होतं. एकजूट असल्याचं दाखविण्यासाठी आणि ग्रेटा थनबर्गचा पाठिंबा मिळविण्याच्या उद्देशाने हे डॉक्युमेंट शेअर करण्यात आल्याचं तिचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
तसंच निकिताने अटेंड केलेल्या झूम कॉलबद्दलही माहिती दिली. 11 जानेवारीला ‘आस्क इंडिया व्हाय’ या नावाने पोएटिक जस्टीस फाउंडेशनतर्फे आयोजित झूम काल तिने अटेंड केला होता. मध्यरात्री अडीचच्या सुमारास झालेल्या या झूम कॉलमध्ये शांतनू मुळूकनेदेखील हजेरी लावली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लोकांचं लक्ष वेधणं हाच या मागचा मुख्य हेतू होता.या कॉलमध्ये दिलेलं मटेरिअल हे लोकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी वापरण्याची परवानगी देण्यात आली होती अशी माहिती तिने दिली आहे.
दिल्लीच्या तीसहजारी न्यायालयाने निकिता जेकबविरोधात अटकपूर्व जामीन बजावला त्यानंतर 11 फेब्रुवारीला निकिता जेकबच्या गोरेगाव येथील घरातून त्यांचा कॉम्प्युटर, मोबाइल यासह काही कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली. जेकब यांचा तपशीलवार जबाबही त्यावेळी नोंदवण्यात आला होता. पोलीस त्यांना अटक करणार होते. मात्र सूर्यास्तानंतर महिलांना ताब्यात घेण्यास वा अटक करण्यास कायद्याने मनाई असल्याने दिल्ली पोलिसांनी जेकब यांना दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता परत येऊ, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी पोलीस त्यांच्या घरी पोहोचले त्या वेळी तपासात सहकार्य करण्याऐवजी त्या फरारी झाल्या, असे वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT