Shakti Mill Gangrape : हायकोर्टाकडून तिन्ही आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

२०१३ साली संपूर्ण मुंबई शहराला हादरवून सोडणाऱ्या शक्तीमिल सामुहिक बलात्कार प्रकरणात मुंबई हायकोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. तिन्ही आरोपींना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचं हायकोर्टाने आजन्म कारावासात रुपांतर केलं आहे. तिन्ही आरोपींना आपलं उर्वरित आयुष्य आता जेलमध्ये काढावं लागणार असून त्यांना पॅरोल आणि फर्लो अशा सवलतींचाही लाभ मिळणार नाहीये.

ADVERTISEMENT

जस्टीस एस.एस.जाधव आणि पी.के.चव्हाण यांच्या खंडपीठाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे.

मार्च २०१४ मध्ये मुंबईच्या सेशन्स कोर्टाने या प्रकरणातील तिन्ही आरोपींना दोषी मानत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. सेशन्स कोर्टाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर हायकोर्टातून मोहोर मिळवणं गरजेचं असतं. या प्रकरणात आरोपींनीही फाशीच्या शिक्षेविरुद्ध हायकोर्टात अपील केलं होतं. तीन आरोपींपैकी दोन आरोपी हे त्याच दरम्यान दाखल झालेल्या एका बलात्कार प्रकरणातील आरोपी होते.

हे वाचलं का?

२०१३ साली २२ वर्षीय फोटो जर्नलिस्टने आपल्यावर सामुहिक बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती. बंद पडलेल्या शक्ती मिल परिसरात एका असाईनमेंटसाठी आपल्या सहकाऱ्यासोबत गेलेली असताना पाच आरोपींनी पीडित महिलेवर बलात्कार केला होता, ज्यात एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश होता. या प्रकरणानंतर १९ वर्षीय टेलिफोन ऑपरेटरनेही आपल्यावर याच परिसरात याच आरोपींकडून बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवली होती.

मुंबई क्राईम ब्रांचने यादरम्यान तपासाची सूत्र वेगाने हलवत विजय जाधव, मोहम्मद कासिम बंगाली, मोहम्मद सलीम अन्सारी, सिराज रेहमान खान आणि एका अल्पवयीन आरोपीला अटक केली होती. मार्च २०१४ मध्ये सेशन्स कोर्टाने जाधव, बंगाली आणि अन्सारी यांना दोषी मानलं होतं. यापैकी सिराज रेहमान खानला आजन्म कारावास तर अल्पवयीन आरोपीला रिमांड होममध्ये पाठवण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

सेशन्स कोर्टाच्या तत्कालीन जज शालिनी फणसळकर-जोशी यांनी या प्रकरणात IPC चं सेक्शन 376 E लावत उर्वरित तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. ज्या शिक्षेचं हायकोर्टाने आजन्म कारावात रुपांतर केलंय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT