भाजप आमदार नितेश राणेंना हायकोर्टाचा दणका, अटकपूर्व जामीन फेटाळला

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजप आमदार नितेश राणे यांना बॉम्बे हायकोर्टाने दणका दिला आहे. बॉम्बे हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. नितेश राणे प्रकरणात बॉम्बे हायकोर्टात सुनावणी सुरू होती. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या आधी शिवसेना नेते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या मास्टरमाईंडला दिल्लीतून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर या प्रकरणी नितेश राणेंचा हात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाल्याचं म्हटलं जातं आहे. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी नितेश राणेंनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र नितेश राणेंचा जामीन फेटाळण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. आज उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली.जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी दरम्यान 18 डिसेंबर रोजी कणकवली येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेण्या हल्ला झाला होता. या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणी अटक होऊ नये म्हणून राणे पसार झाले होते.जिल्हा न्यायालयात त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता.त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.

हे वाचलं का?

मनिष दळवींचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात निकालाला आव्हान जाण्यासाठी दोन आठवड्यांची स्थगिती देण्याची नितेश राणेंच्या वकिलांनी मागणी केलीय. आज दुपारी 12.30 वाजता यावर सुनावणी होणार आहे. नितेश राणेंना तात्पुरता दिलासा मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यातला संघर्ष
नेमका कधी आणि कसा सुरू झाला?

ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात देखील या प्रकरणाचे पडसाद दिसून आले. शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते संतोष परब यांनी आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच, आपल्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीने नितेश राणेंचं नाव घेतल्याचं देखील त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. त्यामुळे संतोष परब यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या तक्रारीत नितेश राणेंचं नाव देखील आलं आहे.

ADVERTISEMENT

हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखण्याच्या हेतूने आपल्याला लक्ष्य केले जात आहे. तसेच खोटय़ा प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा दावा नितेश यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या याचिकेत केला आहे. अ‍ॅड. संग्राम देसाई यांच्यामार्फत नितेश यांनी ही याचिका केली. आता पुढे काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT