संशयातून टोकाचं पाऊल! आधी प्रेयसीला संपवलं, नंतर स्वतःच्या गळ्यावरून फिरवलं धारदार शस्त्र
यवतमाळ शहराला लागून असलेल्या लोहारा एमआयडीसी परिसरात प्रेम प्रकरणातून एका १८ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आरोपी तरुणानेही गळा चिरून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुभम बकाल असं आरोपी तरुणाचं नाव आहे. तर आस्था असं मयत […]
ADVERTISEMENT
यवतमाळ शहराला लागून असलेल्या लोहारा एमआयडीसी परिसरात प्रेम प्रकरणातून एका १८ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आरोपी तरुणानेही गळा चिरून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
शुभम बकाल असं आरोपी तरुणाचं नाव आहे. तर आस्था असं मयत तरुणीचं नाव आहे. शुभमचे आस्था सोबत प्रेम संबंध होते. दरम्यान, आस्थाचे दुसऱ्याच तरुणासोबत प्रेम संबंध असल्याचा संशय शुभमच्या मनात होता. त्यावरून त्याने तिला एमआयडीसी परिसरात भेटण्यासाठी बोलावलं.
तरुणीला एमआयडीसीत बोलावल्यानंतर शुभमने तिच्यावर दगडाने हल्ला केला. दगडाने मारहाण केल्यावर आरोपी शुभम याने तरुणीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात आस्थाचा जागीच मृत्यू झाला.
हे वाचलं का?
तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी शुभम याने देखील स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. शुभम याने स्वत:वर देखील तीक्ष्ण हत्याराने वार केले. शुभम हा रक्ताच्या थारोळ्या पडला.
परिसरातील नागरिकांनी एक तरुण आणि तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहिलं आणि त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत तरुणीचा मृत्यू झाला होता, तर आरोपी शुभम हा जखमी अवस्थेत होता.
ADVERTISEMENT
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी शुभम याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT