Rakshabandhan: रक्षाबंधनाच्या ओवाळणीसाठी निघाले होते, पण बहीण-भावासोबत रस्त्यातच घडलं भयंकर अन्...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Rakshabandhan Accident Update
Rakshabandhan Accident Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रक्षाबंधणाच्या दिवशी बहीण-भावासोबत नेमकं काय घडलं? 

point

दोघांनाही उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं, पण...

point

घटनेची माहिती वाचल्यावर तुम्हीही व्हाल थक्क

Rakshabandhan Latest News : रक्षाबंधनाचा पवित्र सण संपूर्ण देशभरात साजरा केला जात आहे. लाडक्या भावाला ओवाळणी करण्यासाठी बहिणींनी सुंदर राख्या खरेदी केल्याच्या पाहायला मिळत आहे. या आनंदाच्या सणाची चाहूल सर्वांनाच लागली असताना पंढरपूरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. रक्षाबंधणाच्या सणासाठी भावासोबत प्रवास करणाऱ्या बहीणीवरही काळाने घाला घातला. दोघेही ज्या कारने प्रवास करत होते, त्या कारला समोरून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली आणि या भीषण अपघातात बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला. रोहित तात्यासो जाधव (२२), ऋतुजा तात्यासो जाधव (१९) अशी मृतांची नावं आहेत. पंढरपूरपासून जवळच असलेल्या मंगळवेढा मार्गावरील भानवसे येथे हा अपघात घडला. 

ADVERTISEMENT

बहीण-भावासोबत नेमकं काय घडलं? 

शिक्षणासाठी ऋतुजा पुणे येथे रहात होती. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन हा सण आज सोमवारी असल्याने ऋतुजा पंढरपूर येथून एसटी बसने रविवारीच निघाली होती. तिला घेण्यासाठी तिचा भाऊ रोहित कार घेऊन पंढरपूरमध्ये दाखल झाला होता.मंगळवेढा मार्गावरील गोपाळपूरच्या पुढे भानवसे वस्तीजवळ दुपारी साडेचारच्या सुमारास ते पोहोचले होते. या दरम्यान पंढरपूरकडे निघालेल्या आयशर टेम्पोची कारला समोरून जोरात धडक बसली.

हे ही वाचा >> Sambhaji Bhide: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांनी भारतात आश्रय का घेतला? संभाजी भिडेंनी उलगडला 'तो' इतिहास

दोघांनाही उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं, पण...

हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. टेम्पोचीही समोरून मोठी मोडतोड झाल्याचे दिसून आले. कारमधून प्रवास करणारे रोहित आणि ऋतुजा हे भाऊ-बहीण गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात घडल्यावर शेजारी असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. टेम्पोने धडक दिल्यानंतर कारमध्ये दोघेही अडकले होते. त्यानंतर नागरिकांनी त्यांना कारमधून बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेतून पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनाला भद्राचं सावट! राखी बांधण्यासाठी इतकेच तास शुभ

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT