भीषण अपघात : टँकरच्या धडकेनंतर बसला लागली आग; 12 जणांचा होरपळून मृत्यू
राँग साईडने येणाऱ्या टँकरने खासगी बस धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 12 जणांना आपले प्राण गमवावे लागले. राजस्थानमधील बाडमेर-जोधपूर महामार्गावर ही घटना घडली. प्रशासनातील अधिकारी कर्मचारी वेळीच घटनास्थळी पोहोचल्यानं आगीत अडकलेल्या 10 जणांना वाचवण्यात यश आलं. राजस्थानमधील बाडमेर-जोधपूर महामार्गावर टँकर आणि खासगी बस दुर्घटनाग्रस्त झाली. राँग साईडने येत असलेल्या टँकरने प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बसला धडक […]
ADVERTISEMENT
राँग साईडने येणाऱ्या टँकरने खासगी बस धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 12 जणांना आपले प्राण गमवावे लागले. राजस्थानमधील बाडमेर-जोधपूर महामार्गावर ही घटना घडली. प्रशासनातील अधिकारी कर्मचारी वेळीच घटनास्थळी पोहोचल्यानं आगीत अडकलेल्या 10 जणांना वाचवण्यात यश आलं.
ADVERTISEMENT
राजस्थानमधील बाडमेर-जोधपूर महामार्गावर टँकर आणि खासगी बस दुर्घटनाग्रस्त झाली. राँग साईडने येत असलेल्या टँकरने प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बसला धडक दिली. या भीषण अपघातानंतर बसने अचानक पेट घेतला. क्षणार्धातच आगीच्या लोळांनी बसला कवेत घेतलं.
धावत्या स्कॉर्पिओने घेतला पेट; बघा गाडीची कशी झाली अवस्था
हे वाचलं का?
पेट घेतलेल्या बसमधून 25 प्रवास करत होते. त्यातील 12 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे, तर 10 जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं. आगीने संपूर्ण बस पेटल्यानं महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तर मदतीकार्यासाठी मोठ्या संख्येनं पोलीस दाखल झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पचपदराचे आमदार मदन प्रजापत यांच्यासह विभागीय आयुक्तही घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्य सुरू असून, बसमध्ये होरपळून मृत्यू झालेल्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
ADVERTISEMENT
मोठी दुर्घटना टळली! महामार्गावर बसने घेतला पेट; तीन जणांची प्रकृती गंभीर
ADVERTISEMENT
बसमधील एका प्रवाशाने सांगितला घटनाक्रम
या बसमधून सुरक्षितपणे वाचवलेल्या एका प्रवाशाने या टँकर-बस अपघाताचा घटनाक्रम सांगितला. बस 9:55 वाजता बालोतरावरुन निघाली होती. भरधाव बसला राँग साईडने येणाऱ्या टँकरने जोराची धडक दिली. त्यानंतर अचानक बसला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, काही मिनिटातच बस जळून खाक झाली, अशी माहिती या प्रवाशाने दिली.
मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शोक व्यक्त केला आहे. बाडमेरमध्ये झालेल्या बस-ट्रक अपघातासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मदत कार्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, जखमींवर उपचार करण्यासंदर्भातही निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT